नवी दिल्ली - अवकाळी पावसामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने देशातील बाजारांमध्ये कांद्याचे भाव भडकले आहेत. किरकोळ बाजारात कांद्याचे भाव शंभरीपार पोहोचले आहेत. दरम्यान, कांद्याच्या वाढत्या भावांनी केंद्र सरकारच्या चिंतेतही वाढ केली आहे. दरम्यान, आयात केलेला कांदा बाजारात आल्यावर कांद्याचे दर कमी होतील, तसेच कांद्याचे भाव कमी करण्यासाठी काय उपाय योजता येतील, याचा सल्ला सर्वसामान्य नागरिकांनीही सोशल मीडिया किंवा कंझ्युमर अॅपच्या माध्यमातून द्यावा, असे आवाहन केंद्रीय अन्न आणि नागरीपुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी केले आहे. कांद्याच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठामंत्री रामविलास पासवान यांनी आज सचिवांसोबत बैठक घेतली. या बैठकीनंतर पासवान यांनी सांगितले की, ''कांद्याची साठेबाजी करणाऱ्यांवर नजर ठेवली जात आहे. लवकरच बाजारामध्ये नवा आणि आयात केलेला कांदा दाखल होईल. त्यानंतर कांद्याचे भाव वेगाने कमी होतील.'' दरम्यान, कांद्याचे भाव कमी करण्यासाठी काय उपाय योजता येतील, याबाबत पासवान यांनी सर्वसामान्यांकडूनही सल्ला मागवला आहे. कांद्याचे भाव कमी करण्यासाठी काय उपाय योजता येतील, याचा सल्ला सर्वसामान्य नागरिकांनीही सोशल मीडिया किंवा कंझ्युमर अॅपच्या माध्यमातून द्यावा, असे आवाहन रामविलास पासवान यांनी केले.
कांदा शंभरीपार; केंद्रीय मंत्री म्हणतात, आता तुम्हीच सांगा भाव कसे खाली आणायचे ते
By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2019 8:11 PM