वणी - पणन मंत्रालयाच्या आदेशान्वये कृषी उत्पन बाजार समतिीत कांदे विक्र ीसाठी येणार्या कांदयाच्या वाहनांचे वजन बाजार समीतीतील वजन काट्यावर करावे याची अंमल बजावणी सुरू झाली असुन बाजार समतिी व्यापारी व कांदा उत्पादकांच्या परस्पर समन्वयाच्या भुमीके मुळे उपबाजारातील कांदे खरेदी विक्र ीच्या व्यवहारात गतिमानता आली आहे महाराष्ट्र शासनाच्या पणन मंत्रालयाने आदेश पारित करून कृषी उत्पन बाजार समीतीत विक्र ीसाठी आलेल्या कांदयांचे वजन बाजार समीतीतील वजन काट्यावर करावे यानुसार दिंडोरी कृषी उत्पन बाजार समतिी सभापती दत्तात्रय पाटील यांचे अध्यक्षतेखाली कार्यकारी मंडळ कांदा उत्पादक प्रतिनिधी व व्यापारी यांची बैठक झाली त्यात आदेशाच्या अमल बजावणीचा निर्णय घेण्यात आला मात्र व्यापार्यांनी असहकार दाखिवत लिलाव प्रक्रि येत भाग घेतला नव्हता त्यामुळे कांदा खरेदी विक्र ी थंडावली होती. तदनंतर वणीच्या उपबाजारात दिडोरी चांदवड कळवण देवळा तालुक्यातुन विक्र ीसाठी येणारा कांदा पिंपळगाव कृषी उत्पन बाजार समीतीत उत्पादक घेऊन जात होते. यामुळे वणी उपबाजारातील आर्थिक घड़ी व्यवहार अभावी विस्क टल्याने बाजार समतिी व कांदा उत्पादकांचे आर्थिक नुकसान होत होते हा मुद्दा विचारात घेऊन पुन्हा दिडोरी कृषी उत्पन बाजार समीती संचालक मंडळ, व्यापारी कांदा उत्पादक यांची बैठक झाली त्यात उद्योजक अशोक बागमार यांनी मध्यस्थी करून व्यापारी प्रतिनिधी कमलेश चोरिडया, प्रकाश बोरा, पारसमल सिसोदिया राठोड सागर बोरा संचालक नंदलाल चोपड़ा, मनोज चोपड़ा पार समल बोरा गितेश बोरा यांनी सामोपचाराने कांदा खरे दीची तयारी दर्शविली व उपबाजारातील वजन काट्यावर कांदयांच्या वाहनांचे वजन करण्याचा निर्णय मान्य करून कांदा खरेदीस प्रारंभ केला वणीच्या उपबाजारात आज 103 वाहना मधुन सुमारे अडी च हजार क्कींटल कांदयाची आवक झाली 738 रु पये कमाल 400 रु पये किमान तर 600 रु पये सरासरी दर प्रति क्विंटल अशा दराने खरेदीविक्र ी झाल्याची माहिती राजेंद्र रणधीर व मुक्तार शहा यांनी दिली दरम्यान उपबाजारातील कांदा खरेदी विक्र ीचे व्यवहार पूर्ववत झाल्याने आर्थिक गतिमानता वाढली आहे.
कांदा खरेदी विक्री व्यवहार पूर्ववत
By admin | Published: July 10, 2017 6:57 PM