गोरखपूर : भारत सरकारद्वारे नेपाळमध्ये कांद्याच्या निर्यातीवर बंदी आणण्यात आली आहे. यानंतर नेपाळच्या सीमेवर गेलेल्या कांद्याच्या ट्रकना सैन्याने माघारी पाठविले. देशात कांद्याची दरवाढ झाल्याने सरकारने हे पाऊल उचलले आहे. नेपाळच्या बाजारातही कांदे गायब झाल्याने तेथील किंमती वाढल्या आहेत. याचाच फायदा भारतीय व्यावसाययिक उठविण्याच्या प्रयत्नात होते.
भारत-नेपाळ सीमेवर सोनौली भागात कांद्याची वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या रांगा लागल्या होत्या. हे सर्व ट्रक माघारी पाठविल्याने वाहतूकारांमध्ये खळबळ माजली आहे. वाहतूकदार सन्नी गुप्ता यांनी सांगितले की, राजमार्गावर वाहतूक कोंडी झाल्याने हे ट्रक तीन दिवसांपासून उभे करून ठेवण्यात आले होते. सीमेवर येऊनही नेपाळला जाऊ शकले नसल्याने मोठे नुकसान होत आहे.
तर याचा फटका व्यापाऱ्यांनाही बसला आहे. जर त्यांनी आधीच सांगितले असते तर माल उचचला नसता. सरकारने बंदी आणून नेपाळशी असलेल्या व्यापाराशी संबंधीत लोकांचे नुकसान केले आहे.
नेपाळमध्ये कांद्याची टंचाई आहे. तेथील पहाडी भागांमध्ये 140 रुपये किलोने कांदा विकला जात आहे. तर मैदानी भागात 100 ते 110 रुपये किलोने कांदा विकला जात आहे.