ऑनलाइन सट्टेबाजी ॲप बेकायदेशीर नाही, सरकार २८% जीएसटी घेते, काँग्रेसचा भाजपावर पलटवार   

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2023 02:15 PM2023-11-04T14:15:41+5:302023-11-04T14:16:17+5:30

छत्तीसगडमध्ये निवडणुकीपूर्वी महादेव बेटिंग ॲप घोटाळ्यावरून राजकारण पेटले आहे. काल ईडीच्या कारवाईमध्ये मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचं नाव समोर आल्याने भाजपा आक्रमक झाली आहे. त्यानंतर काँग्रसनेही भाजपावर पलटवार केला आहे.

Online betting app not illegal, Govt collects 28% GST, Congress hits back at BJP | ऑनलाइन सट्टेबाजी ॲप बेकायदेशीर नाही, सरकार २८% जीएसटी घेते, काँग्रेसचा भाजपावर पलटवार   

ऑनलाइन सट्टेबाजी ॲप बेकायदेशीर नाही, सरकार २८% जीएसटी घेते, काँग्रेसचा भाजपावर पलटवार   


छत्तीसगडमध्ये निवडणुकीपूर्वी महादेव बेटिंग ॲप घोटाळ्यावरून राजकारण पेटले आहे. काल ईडीच्या कारवाईमध्ये मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचं नाव समोर आल्याने भाजपा आक्रमक झाली आहे. शनिवारी भाजपाने छत्तीसगड सरकारच्या सहभागाबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यानंतर काँग्रसनेही भाजपावर पलटवार केला आहे. काँग्रेसच्या मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल, संचार विभाग प्रमुख जयराम रमेश, राज्यसभा खासदार अभिषेक मनु सिंघवी क्रमबद्धपणे भाजपाने केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. 

जयराम रमेश म्हणाले की, हे सुडबुद्धीचं राजकारण आहे. हा अधिकारांचा उघड दुरुपयोग आहे. छत्तीसगडमध्ये भाजपाचा पराभव निश्चित आहे. त्यामुळे अशा कारवाया केल्या जात आहेत. छत्तीसगडमधील विद्यमान सरकारवर जनतेचा विश्वास कायम आहे आणि काँग्रेसचं सरकारच पुन्हा सत्तेत येणार आहे. त्यामुळेच निवडणुकीच्या शेवटच्या दिवसांमध्ये ईडीचा मोठ्या प्रमाणावर दुरुपयोग केला जात आहे.

जयराम रमेश म्हणाले की, ऑनलाइन बेटिंग ॲप प्रकरणामध्ये मार्च २०२२ पासून छत्तीसगड सरकार कारवाई करत आहे. ओदिशा, दिल्ली, मध्य प्रदेशमध्ये छापे मारले जात आहेत. मात्र राज्य सरकार दुबईमध्ये छापे मारू शकत नाही. केंद्र सरकारने याबाबत कारवाई केली पाहिजे. मात्र त्यांनी याबाबत काहीही केलेलं नाही. जयराम रमेश पुढे म्हणाले की, ऑनलाइन बेटिंग अॅपला केंद्र सरकारने कायदेशीर दर्जा दिलेला आहे. तसेच या अॅपवर २८ टक्के जीएसटीसुद्धा लागू केलेला आहे. याला कायदेशीर दर्जा दिलेला आहे, ते बेकायदेशीर नाहीत.

जयराम रमेश यांनी पुढे सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेसच्या योजनांची रेवडी म्हणत खिल्ली उडवायचे. मात्र काल भाजपानं जो जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे, तो केवळ कॉपी करून तयार केलेला जाहीरनामा आहे. धान खरेदीपासून ते सिलेंडरपर्यंत आमच्या घोषणांची कॉपी करण्यात आलेली आहे. जेव्हा आम्ही कर्नाटकमध्ये गॅरंटी दिली तेव्हा त्याची खिल्ली उडवली गेली.. आता म्हणताहेत की छत्तीसगडमध्ये मोदींची गॅरंटी असेल. हे सर्व काय दाखवतंय, असा टोला त्यांनी लगावला.  

Web Title: Online betting app not illegal, Govt collects 28% GST, Congress hits back at BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.