शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

पाचवीपर्यंत ऑनलाईन वर्गांना बंदी, या राज्य सरकारने घेतला निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2020 5:35 AM

शैक्षणिक वर्ष वेळेवर : लहान मुलांच्या मानसिकतेचा केला विचार

बंगळुरू : कर्नाटकातील शाळांनी इयत्ता पाचवीपर्यंत सुरूकेलेले आॅनलाईन वर्ग बंद करण्याचे आदेश राज्य सरकारने बुधवारी दिले. कोरोनाची साथ व लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वेळेवर सुरू व्हावे म्हणून शाळांनी हे पाऊल उचलले होते. यासंदर्भात कर्नाटकचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण खात्याचे मंत्री एस. सुरेशकुमार यांनी सांगितले की, शाळांनी पूर्व प्राथमिक ते इयत्ता पाचवीपर्यंत आॅनलाईन वर्ग सुरू केले होते. मात्र, या इयत्तांमधील मुले अगदीच लहान वयाची असतात. आॅनलाईन शिक्षण घेण्याची या मुलांची मानसिक तयारी झालेली नसते. मुलांच्या भवितव्याचा विचार करून इयत्ता पाचवीपर्यंत आॅनलाईन वर्ग घेण्यास राज्य सरकारने बंदी घातली आहे.

ते म्हणाले की, आॅनलाईन शिक्षण देण्यासाठी खाजगी शाळांनी फी आकारू नये असाही आदेश राज्य सरकारने दिला आहे. मात्र, माध्यमिक शिक्षणासाठी आॅनलाईन वर्ग घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. शिक्षण विभागाशी संबंधित अधिकारी तसेच विविध शाळांचे संचालक यांच्या बैठकीत एस. सुरेशकुमार बोलत होते. आॅनलाईन वर्गात शिकणे हे सहा वर्षे वयाखालील मुलांच्या विकासासाठी फारसा चांगला पर्याय नाही, असे नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्सेस या संस्थेने आपल्या एका अहवालात म्हटले आहे. ६ वर्षे वयापुढील मुलांनीही इलेक्ट्रॉनिक उपकरणाच्या स्क्रीनसमोर दिवसभरात एका तासापेक्षा जास्त काळ बसू नये, असेही या संस्थेने म्हटले आहे.समाजातील दरी वाढवू नकाच्राज्यभरात आॅनलाईन शिक्षण देताना समाजातील आर्थिक दरीचाही विचार सरकारने करायला हवा. ही दरी वाढता कामा नये, असे शिक्षणतज्ज्ञांना वाटते. च्समाजात आहे रे व नाही रे असे दोन वर्ग आहेत. त्यातील नाही रे वर्गातील लोकांना आपल्या मुलांना आॅनलाईन शिक्षण देणे परवडणार नाही. तो विचार करूनच कर्नाटकमध्ये इयत्ता पाचवीपर्यंत आॅनलाईन शिक्षण न देण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.

टॅग्स :onlineऑनलाइनSchoolशाळा