गेल्या काही वर्षांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे ऑनलाइन फ्राॅड हाेण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यात एका नव्या फ्राॅडची भर पडली आहे, ते म्हणजे नाेकरीच्या नावावर हाेणारी फसवणूक नाेकरीच्या शाेधात असलेल्या तरुणांना आधीही अनेक प्रकारे फसविले जायचे. मात्र,भामट्यांनी ऑनलाइन माध्यमांचा वापर करून फसवणुकीचे जाळे वाढविले आहे. त्यात अनेक जण अडकत आहेत. फसवणूक हाेण्यापेक्षा स्वत:ला सुरक्षित ठेवणे हा सर्वाेत्तम उपाय. या जाळ्यापासून कसे वाचवायचे, याबाबत सरकारनेच काही महत्त्वपूर्ण टिप्स दिल्या आहेत. तुम्हाला व्हाॅट्सॲप सारख्या साेशल मेसेजिंग ॲपवर काही ठराविक पद्धतीचे मेसेज येतात.
तुम्हाला नाेकरी हवी का?
- पार्ट टाईम जाॅबसाठी अर्ज करा
- दरराेज २ ते ५ हजार कमवा
- नाेंदणीसाठी तुम्हाला काही हजार रुपये जमा करण्यास सांगतात.
- नवीन नवीन कारणे सांगून पुन्हा पैसे मागितले जातात.
- लिंक पाठवून तुमची माहिती पुरविण्यास सांगितले जाते.
- माहिती दिली,की तुमचे बँक खाते हॅक करून पैसे वळविले जातात.
- काेणतीही नामांकित कंपनी नाेकरीसाठी तुम्हाला कधीही पैसे मागणार नाही. त्यामुळे काेणालाही पैसे देऊ नका.
- असे मेसेज आले तर समजा हे हमखास स्कॅम आहे. जाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न हाेताेय.
दुसरी पद्धतस्कॅमर्सकडून नामांकित कंपन्यांच्या नावे खाेटे एसएमएस पाठवून पार्ट टाईम नाेकरीचे आमिष दाखवितात. माेठी कमाई हाेईल, या आशेने अनेक जण त्यास बळी पडतात. काॅल सेंटरवरून अनेकांना जाॅब बाबत फाेन येतात. नाेंदणीच्या नावाखाली पैसे जमा करण्यास सांगितले जाते.कसे स्वत:ला वाचवाल?
- जाॅबच्या नावाने आलेल्या लिंकला क्लिक करू नका. कितीही माेठी ऑफर असेल तरीही स्वत:वर नियंत्रण ठेवा.
- अनाेळखी व्यक्तींसाेबत काेणतेही आर्थिक व्यवहार करताना सावध राहा.
- अशा प्रकारचे मेसेज पाठविणाऱ्यांचे नंबर्स ब्लाॅक करा आणि रिपाेर्ट करा.
- सायबर गुन्ह्यांत फसवणूक झाली, तातडीने www.cybercrime.gov.in या वेबसाईटवर तक्रार दाखल करा.