शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

ऑनलाइन पासपोर्ट सेवा पोर्टल ५ दिवस बंद राहणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 1:05 PM

या कालावधीत पासपोर्टच्या कामांसाठी भेटीच्या वेळा देण्यात येणार नाहीत तसेच आधी दिलेल्या भेटीच्या वेळांमध्ये फेरबदल केले जाणार आहेत. 

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : तांत्रिक देखभालीसाठी ऑनलाइन पासपोर्ट सेवा पोर्टल गुरुवारी रात्री ८ वाजल्यापासून बंद ठेवण्यात आले असून पुढील पाच दिवस म्हणजे २ सप्टेंबरपर्यंत ते बंद  राहणार आहे. त्यामुळे या कालावधीत पासपोर्टच्या कामांसाठी भेटीच्या वेळा देण्यात येणार नाहीत तसेच आधी दिलेल्या भेटीच्या वेळांमध्ये फेरबदल केले जाणार आहेत. 

पासपोर्ट सेवा पोर्टलवरील निवेदनात म्हटले आहे की, दि.२९ ऑगस्टला रात्री ८ वाजेपासून पासपोर्ट सेवा पोर्टलचे काम बंद ठेवण्यात येईल. २ सप्टेंबरला सकाळी ६ वाजेपर्यंत तेथे पासपोर्ट सेवा उपलब्ध नसेल. शुक्रवारी, दि. ३० ऑगस्ट रोजी ज्यांना पासपोर्ट कामासाठी याआधीच भेटीची वेळ दिली असेल त्यात फेरबदल करण्यात येणार आहेत. सुधारित वेळ संबंधितांना नंतर कळविली जाणार आहे.  परराष्ट्र खात्याच्या अख्यत्यारित पासपोर्ट सेवा येते. त्या खात्यातील सूत्रांनी सांगितले की, तांत्रिक देखभालीसाठी पोर्टलचे काम काही दिवस बंद ठेवण्यात येते. हा नेहमीच्या प्रक्रियेचा एक भाग आहे.  

असे चालते पासपोर्ट सेवा केंद्राचे कामदेशभरातील पासपोर्ट सेवा केंद्रांमध्ये या पोर्टलच्या साहाय्यानेच काम चालते. या सेवा केंद्रांत कागदपत्रांची बारकाईने तपासणी होते. त्यानंतर पोलिसांकडून त्या व्यक्तीच्या माहितीची पडताळणी केली जाते. अर्ज केल्याच्या ३० ते ४५ दिवसांत संबंधिताला पासपोर्ट दिला जातो. 

टॅग्स :passportपासपोर्ट