शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
3
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
4
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
5
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
6
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
7
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
8
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
9
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
10
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
11
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
12
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
13
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
14
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
15
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
16
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
17
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
18
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
19
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
20
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य

आरोग्य सेवेवर GDP च्या तुलनेत केवळ १ टक्के खर्च, नव्या मागणींसाठी सरकार असमर्थ

By अतुल कुलकर्णी | Updated: January 29, 2021 10:39 IST

भारतातील 640 जिल्ह्यांपैकी 33 जिल्ह्यांमध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल व अत्याधुनिक सोयी सुविधा असणारी कार्पोरेट हॉस्पीटल कार्यरत आहेत

ठळक मुद्देमहाराष्ट्रापुरता विचार केल्यास, सार्वजनिक आरोग्य विभागाला एकूण अर्थसंकल्पाच्या 4 टक्के तरतूद करायला पाहिजे, असे कायदा सांगतो. पण, प्रत्यक्षात आजपर्यंत कधीही 0.8 टक्क्यांच्यावर ही तरतूद केली गेली नाही, असे स्वत: आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलंय,

अतुल कुलकर्णी

मुंबई - देशातील आरोग्य सेवेवर आजपर्यंत जीडीपीच्या केवळ 1 ते 1.2 टक्के एवढाच खर्च करण्यात आलाय. राज्यातही आरोग्य सेवेवर केवळ 1 टक्काच खर्च करण्यात येतो. त्यामुळे, दररोज नवनवीन विकसीत होणारी आरोग्य सेवा आणि सतत वाढणारी मागणी करण्यास सरकार पूर्णपणे असमर्थ ठरत आहे. कोरोनामुळे देशातील आणि सर्वच राज्यांच्या आरोग्य यंत्रणांचं वास्तव उघडं पडलं असून महामारीच्या संकटाला सामना करण्यासाठी सरकार किती सक्षम? असा प्रश्न निर्माण होत आहे. 

भारतातील 640 जिल्ह्यांपैकी 33 जिल्ह्यांमध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल व अत्याधुनिक सोयी सुविधा असणारी कार्पोरेट हॉस्पीटल कार्यरत आहेत. त्यातचही, पुणे, मुंबई, ठाणे, अहमदाबाद, चेन्नई, बंगळुरू आणि हैदराबाद या 7 शहरात 20 टक्के हॉस्पीटल मल्टीस्पेशालिटी सुविधांची आहेत. महाराष्ट्रापुरता विचार केल्यास, सार्वजनिक आरोग्य विभागाला एकूण अर्थसंकल्पाच्या 4 टक्के तरतूद करायला पाहिजे, असे कायदा सांगतो. पण, प्रत्यक्षात आजपर्यंत कधीही 0.8 टक्क्यांच्यावर ही तरतूद केली गेली नाही, असे स्वत: आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलंय, तीच अवस्था वैद्यकीय शिक्षण विभागाची आहे.      

व्यवस्थेची तुलना

एम्स हे दिल्लीतील सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल आहे. तेथे औषधे साधनसामुग्री, देखभाल दुरुस्ती, वीज, पाणी या सगळ्यांसह एका बेडमागे 22 लाख रुपये खर्च केले जातात. आपल्याकडे जेजे हे सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल आहे, तेथे एका बेडमागे दीड लाख खर्च केले जातात. तर, सार्वजनिक आरोग्य विभागाकडे असणाऱ्या 26,583 बेडसाठी ऑक्सीजन, औषधे, स्थानिक खरेदी, लिनन, लॅब, यंत्रसामुग्री आदींसह 200 बेडच्या हॉस्पीटलसाठी 80 हजार, 100 बेडच्या हॉस्पीटलसाठी 60 हजार, 50 बेडच्या हॉस्पीटलसाठी 45 हजार व 30 बेडच्या हॉस्पीटलसाठी 36 हजार या प्रमाणात खर्च केला जातो. या तिन्ही प्रकारात कुठेही पगार आणि अन्य खर्चाचा समावेश नाही. 

बेड्स वाढवा

दिल्लीतील एम्समध्ये 2483 बेड्स आहेत, त्यांच्याकडे वर्षाला 36 लाख 70 हजार रुग्ण ओपीडीमध्ये येतात. त्यांचे वर्षाचे बजेट 3600 कोटी रुपये एवढे आहे. महाराष्ट्रात 18 सरकारी मेडिकल कॉलेज आहेत. त्यात, 13980 बेड आहेत. वर्षभरात येथे जवळपास 1 कोटी रुग्ण ओपीडीमध्ये येतात. आपले वर्षाचे बजेट 3750 कोटी रुपये एवढे आहे. यात पगाराचाही समावेश आहे. 

सार्वजनिक आरोग्यावर कोणाचा किती खर्च

स्वीडन - 9.2 टक्केफ्रान्स, डेन्मार्क - 8.7 टक्केबेल्जियम, नेदरलँड - 8.6 टक्केस्वित्झर्लंड, नार्वे, अमेरिका - 8.5 टक्केयूके, ऑस्ट्रेलिया, कॅनडा - 7.8 टक्के

आशियाई देशमालदीव - 9.4 टक्केथाललंड - 2.9 टक्केभूतान - 2.5 टक्केभारत - 1.28 टक्के

टॅग्स :MumbaiमुंबईHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सRajesh Topeराजेश टोपे