ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 1- भारतातल्या एकूण लोकसंख्येपैकी फक्त 1 टक्केच लोक कर भरतात. तसेच 5 हजार 430 लोक 1 कोटींहून अधिक कर भरत असल्याची महत्त्वाची माहिती केंद्र सरकारच्या आकडेवारीतून समोर आली आहे. 2012-13च्या कर निर्धारणातून ही माहिती उघड झाली आहे.
केंद्र सरकारनं कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी 15 वर्षांची कर संकलनाची माहिती जनतेसमोर खुली केली आहे. 2012-13ची माहिती आतापर्यंत समोर आली आहे. 31 मार्च 2012नंतर संपलेल्या आर्थिक वर्षात जवळपास 2.87 कोटी लोकांनी प्राप्तीकर परतावा जमा केलेला नाही. त्यातही 1.62 कोटी लोक करबुडवे निघाले आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष फक्त 1.25 कोटी लोकांनी कर भरला आहे. भारताची तेव्हाची लोकसंख्या पाहिल्यास तुलनेत हे प्रमाण फक्त 1 टक्केच आहे.
केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार 1.11 टक्के लोकांनी म्हणजे 89 टक्के लोकांनी 1.5 लाखांहून कमी कर भरला आहे. कराच्या रकमेची सरासरी 21 हजार कोटी इतकी दिसून आली आहे. एकूण 23 हजार कोटी इतकी करातून रक्कम सरकारच्या तिजोरीत जमा झाली आहे. 5 हजार 430 लोकांनी 1 कोटींहून अधिक कर भरणा केला आहे. त्यातही 5 हजार लोकांनी 1 ते 5 कोटींपर्यंत कर भरला असल्याची माहिती समोर आली आहे. कर स्वरूपात लोकांकडून 8 हजार 907 कोटी जमा झाले आहेत.
2015-16 या वर्षांत प्राप्तीकराच्या रकमेत नऊ पटीनं वाढ झाल्याचं या आकडेवारीवरून निदर्शनास येतं आहे. सरकारला आतापर्यंत करातून 2.86 लाख कोटी रुपये मिळाले आहेत.