नगररचना विभाग लागला कामाला केवळ १५७ फाईल्स प्रलंबित: फेब्रुवारी, मार्च मधील प्रकरणांची तपासणी सुरू
By admin | Published: April 01, 2016 12:37 AM
जळगाव : नगररचना विभागातील प्रलंबित फाईल्स मार्गी लावण्यावरून महापौर नितीन ला यांनी दिलेल्या तंबीनंतर दडपून ठेवलेल्या अनेकांच्या फाईल्स पटापट वितरित झाल्या आता केवळ १५७ फाईल्स प्रलंबित असून त्यावरच लवकरच निर्णय अपेक्षित आहे.
जळगाव : नगररचना विभागातील प्रलंबित फाईल्स मार्गी लावण्यावरून महापौर नितीन ला यांनी दिलेल्या तंबीनंतर दडपून ठेवलेल्या अनेकांच्या फाईल्स पटापट वितरित झाल्या आता केवळ १५७ फाईल्स प्रलंबित असून त्यावरच लवकरच निर्णय अपेक्षित आहे. नगररचना विभागातील प्रलंबित कामांना गती यावी म्हणून आयुक्त संजय कापडणीस यांनी २ व ३ मार्च रोजी दिवसभर नगररचना विभागातच ठिय्या मांडून ३५५ फाईल्स एका दिवसात निकाली काढल्या. मात्र निपटारा झालेल्या फाईल्स अद्यापही सबंधितांना दिल्या गेलेल्या नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. याप्रश्नी नगररचना साहाय्यक संचालक चंद्रकांत निकम यांना महापौर नितीन ला यांनी गेल्या १९ रोजी पाचारण करून जाब विचारला असता त्यांनी आयुक्तांकडे अंगुलीनिर्देश केला होता. फाईल्सच्या बदल्यात काही दलाल पैसे मागत असल्याचा धक्कादायक प्रकार कानावर आल्याने महापौरांनी हा विषय गांभीर्याने घेऊन संबंधितांना बोलावून घेऊन २१ पासून त्यांच्याकडून योग्य तो भरणा झाल्याची चौकशी करून त्यांना प्रकरण मंजुरीच्या फाईल्स दिल्या जाव्यात असे आदेश दिले होते. आयुक्त कापडणीस यांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनीही तातडीने नगररचा विभागातील अभियंत्यांची बैठक घेऊन त्यांना प्रलंबित फाईल्सवर तातडीने निर्णय घेऊन त्या संबंधितांना दिल्या जाव्यात अशा सूचना केल्या होत्या. ------ इन्फो... बैठकीचे नियोजन नाहीचनगररचना विभागाकडे दाखल फाईल्स प्राप्त झाल्यानंतर दाखल क्रमांकासह (इनवर्ड) नावांची यादी महापौरांकडे सादर करणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. दाखल फाईन्स, त्यांची मंजुरी, त्यात येणार्या अडचणी या संदर्भात पंधरा दिवसात बुधवारी बैठक घेतली जाणार होती. या विभागाच्या कामकाजाचा आढावा आता घेतला जाणार आहे. यासाठी तांत्रिक माहितगार व्यक्तीलाही बोलावून प्रकरणाबाबत सोक्षमोक्ष लावला जाईल असे सांगितले हाते. मात्र पंधरा दिवसात ही बैठक अद्यापही झालीच नाही. ------