ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, 1 - अर्थसंकल्पातून देशातील सध्याच्या प्राप्तिकर भरणाऱ्यांच्या संख्येवरही प्रकाश टाकला. देशातील संघटित क्षेत्रात 4.1 कोटी कर्मचारी आहेत. पण त्यापैकी केवळ 1.74 कोटी कर्मचारीच प्राप्तिकर रिटर्न फाइल करतात. देशात करचुकव्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे त्यांचा भार प्रामाणिकपणे कर भरणाऱ्यांवर पडत असल्याचे जेटली यांनी सांगितले. देशातील करभरणा करणाऱ्यांविषयी अर्थसंकल्पात मांडलेली आकडेवारी
- संघटित क्षेत्रात 4.1 कोटी कमर्चारी पण 1.74 कोटी कर्मचा-यांनीच रिर्टन फाईल केला.
- कर चुकवणा-या लोकांची संख्या मोठी आहे, त्यामुळे त्यांचा भार प्रामाणिकपणे कर चुकवणा-यांवर येतो.
- 76 लाख लोकांनी त्यांचे उत्पन्न 5 लाखापेक्षा जास्त दाखवले, 99 लाख लोकांनी त्यांचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी दाखवले.
- 99 लाख लोकांनी इन्कम टॅक्स रिटर्न फाइल केले, परंतु त्यांचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा म्हणजे, करमुक्त असल्याचे दाखवले.
- 24 लाख लोकांचे उत्पन्न वार्षिक 10 लाख रुपयांपेक्षा जास्त दाखवतात.
- 1 लाख 74 हजार जणांनी आपले उत्पन्न 50 लाखांपेक्षा जास्त असल्याचे नमूद केले आहे.
- नोटाबंदीमुळे बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात कॅश जमा झाली असल्याने पुढील वर्षी महसुली तूट कमी होईल, अशी अपेक्षा.