ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, 1 - राजकीय पक्षांकडे येणाऱ्या बेहिशेबी देणग्यांवर चाप लावण्यासाठी अर्थसंकल्पातून पाऊल उचलण्यात आले आहे. आज जाहीर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या तरतुदीनुसार केवळ दोन हजार रुपयांपर्यंतच्या देणग्याच राजकीय पक्षांना रोखीने स्वीकारण्यात येणार आहेत. तसेच सर्व अटीशर्ती पूर्ण करणाऱ्या राजकीय पक्षांनाच प्राप्तिकरातून सूट देण्यात येणार आहे.
अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या तरतुदीनुसार राजकीय पक्षांना यापुढे चेक आणि डिजिटल माध्यमातूनच देणग्या स्वीकाराव्या लागतील. राजकीय पक्षांनी निधी उभारणीसाठी निवडणूक रोखे काढावेत असा प्रस्ताव अर्थसंकल्पामधून जेटलींनी मांडला. या निर्णयामुळे राजकीय क्षेत्रातील काळा पैसा संपुष्टात येईल अशी आशा आहे.
राजकीय पक्षांना देण्यात येणाऱ्या नियमांबाबत करण्यात आलेले नियमावली पुढील प्रमाणे
- राजकीय पक्षांना २ हजार पेक्षा जास्त निधी रोखीत घेता येणार नाही
- राजकीय पक्षांना यापुढे चेक आणि डीजीटल माध्यमातून निधी स्वीकारावा लागेल
- राजकीय पक्षांनी निधी उभारणीसाठी निवडणूक रोखे काढावेत