लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : सध्याच्या लोकसभेच्या पहिल्या तीन वर्षांत एकूण ५४३ सदस्यांपैकी फक्त पाच सदस्यांनी प्रत्येक बैठकीला हजर राहून १०० टक्के उपस्थिती लावली आहे. निम्म्या किंवा त्याहूनही कमी बैठकांना हजर राहिलेल्या सदस्यांची संख्या २२ आहे.उत्तर प्रदेशातील बांदा येथील खासदार भैरो प्रसाद मिश्रा सर्व बैैठकांना हजर राहिले एवढेच नव्हे तर त्यांनी सर्वाधिक म्हणजे १,४६८ चर्चांमध्येही भाग घेतला. शंभर टक्के उपस्थिती लावणारे लोकसभेचे इतर चार सदस्य असे- कुलमनी समाल (बिजू जनता दल, जगतसिंगपूर), गोपाळ शेट्टी (भाजपा, उत्तर मुंबई), किरिट सोलंकी ( भाजपा,अहमदाबाद प.) आणि रमेशचंद्र कौशिक (भाजपा, सोनेपत).‘पीआरएस लेजिस्लेटिव्ह रीसर्च’ने केलेल्या विश्लेषणानुसार लोकसभेचे २५ टक्के म्हणजे १३३ सदस्य ९० टक्के किंवा त्याहून अधिक बैठकांना उपस्थित होते. बरेच दिवस तब्येत बरे नसलेल्या काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची ५९ टक्के बैठकांना उपस्थिती होती. तर त्यांचे चिरंजीव व पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी त्याहून कमी म्हणजे ५४ टक्के बैठकांना हजर होते. ‘शॉटगन’ म्हणून ओळखले जाणारे व सभागृहाबाहेर खूप बोलणारे शत्रुघ्न सिन्हा ७० टक्के बैठकांना हजर हालि खरे पण त्यांनी सभागृहात एकदाही तोंड उघडले नाही.
फक्त ५ खासदारांची पूर्ण हजेरी
By admin | Published: June 05, 2017 4:17 AM