शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
3
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
4
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
8
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
9
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
10
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
12
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
13
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
14
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
15
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
16
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
17
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
18
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
19
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर
20
महाराष्ट्रात मविआ सरकार स्थापन करु, एकही प्रकल्प बाहेर जाऊ देणार नाही; राहुल गांधींचा शब्द

भारतीय यंत्रणांना फक्त ६ अतिरेक्यांना रोखता आले नाही - जैश-ए-मोहम्मदने उडवली खिल्ली

By admin | Published: January 09, 2016 9:33 AM

भारतीय सुरक्षा यंत्रणांना पठाणकोट हवाई दलाच्या तळावर हल्ला करणा-या अवघ्या ६ दहशतवाद्यांना रोखता आले नाही अशा शब्दात जैश ए मोहम्मदच्या म्होरक्याने खिल्ली उडवली,

ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद / पठाणकोट, दि. ९ - 'भारतीय सुरक्षा यंत्रणांना पठाणकोट हवाई दलाच्या तळावर हल्ला करणा-या अवघ्या ६ दहशतवाद्यांना रोखता आले नाही' अशा शब्दात कुख्यात दहशतवादी संघटना 'जैश ए मोहम्मद'चा प्रमुख मौलाना मसूद अझहरने खिल्ली उडवली आहे. या संघटनेतर्फे www.alqalamionline.com या वेबसाईटवर एक ऑडिओ क्लिप अपलोड करण्यात आली असून त्यात पठाणकोट हल्ल्याशी संबंधित गोष्टींबाबत खुलासा करत असून हा हल्ला कसा घडवण्यात आला तेही स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच अझहर याच्या बहावलपूर या शहरातून प्रसिद्ध होणा-या एका उर्दू वृत्तपत्रातही १३ मिनिटांच्या या ऑडिओ क्लिपबाबत मजकूर छापण्यात आला आहे. 
गेल्या आठवड्यात २ जानेवारी रोजी लष्कराच्या वेशात आलेल्या काही दहशतवाद्यांनी पठाणकोटमधील हवाई दलाच्या तळावर घुसून हल्ला केला. तीन दिवसांच्या चकमकीनंतर भारतीय जवानांनी सहा अतिरेक्यांना यमसदनी धाडले, मात्र त्यात सात जवान शहीद झाले तर ५० हून अधिक जण जखमी झाले. 
या ऑडिओ क्लिपमध्ये सुरक्षा यंत्रणांची खिल्ली उडवण्यात आली आहे तसेच दहशतवाद्यांनी भारतीय रणगाडे, सैन्याच्या गाड्या व हेलिकॉप्टर्सवर कसा हल्ला चढवला हेही नमूद करण्यात आले आहे. 
'पाकिस्तानचे नेते भारताने केलेल्या आरोपांसमोर का झुकतात?' असा सवाल विचारत मौलाना मसूद अझहरने पाकिस्तानला भारताने दिलेले पुरावे न स्वीकारण्याची धमकी दिली आहे. आमच्या सहा दहशतवाद्यांशीही भारतीय सैन्यातील जवान लढू शकले नाहीत, अशी खिल्ली त्यात उडवण्यात आली आहे. तसेच या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले लेफ्टनंट कर्नल निरंजन कुमार आणि शूटर फतेह सिंग क्रूरपणे मारल्याचे सांगत भारतीय सुरक्षा यंत्रणा अतिशय ढिसाळ असल्याची टीकाही करण्यात आली आहे. ' ते (जवान) अतिशय वाईट पद्धतीने मारले गेले. भारताने पहिल्यांदा सहा दहशतवादी असल्याचे सांगितले, मग तो आकडा पाच वर गेला आणि नंतर चार दहशतवादी झाले...! एवढा मोठा देश अश्रूंच्या पुरात बुडाला आहे.  तेथील (भारत) सरकार भित्रे असून ते केवळ आमच्यावर आरोप करत सुटले आहेत' अशी संतापजनक भाषा ऑडिओत वापरण्यात आली आहे.