देशात केवळ मोजक्याच उद्योजकांची संपत्ती वाढतेय - रघुराम राजन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2022 06:24 AM2022-12-16T06:24:54+5:302022-12-16T06:25:10+5:30
राहुल गांधी भेटी यांनी भेटीदरम्यान फार्म हाऊसच्या टेरेसवर रघुराम राजन यांची आर्थिक समस्यांवर मुलाखत घेतली.
लोकमत न्यूज नेटवर्क
कोटा : रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी मध्यमवर्गीयांच्या फायद्यासाठी धोरणे बनवण्याचे समर्थन केले आहे. राजन यांनी ‘भारत जोडो यात्रे’तही सहभाग घेतला होता. कॉमेडियन कुणाल कामराही गुरुवारी दिवसभर यात्रेत सहभागी झाला.
राहुल गांधी भेटी यांनी भेटीदरम्यान फार्म हाऊसच्या टेरेसवर रघुराम राजन यांची आर्थिक समस्यांवर मुलाखत घेतली. ‘कोरोनाच्या काळात श्रीमंत वर्गाचे उत्पन्न वाढले, कारण ते घरून काम करू शकत होते. परंतु, गरीब लोकांना कारखाने बंद असल्याने घरात बसावे लागले. त्यामुळे पैसे येणे बंद झाले. त्यामुळे ही विषमता आणखी वाढली आहे,’ असे मत राजन यांनी व्यक्त केले.
बेरोजगारीच्या समस्येवर विचारले असता ते म्हणाले की, लोकांना सरकारी नोकऱ्या हव्या आहेत, कारण नोकरीची सुरक्षितता आहे, पण खूप कमी लोक सरकारी नोकऱ्यांमध्ये काम करू शकतात. खासगी क्षेत्र आणि कृषी क्षेत्रात तंत्रज्ञान आणले तर रोजगाराच्या नवीन संधी
निर्माण होतील.