Punjab: 'पंजाबबद्दल असलेलं माझं व्हिजन फक्त 'आप'ने ओळखलं', सिद्धूंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2021 04:06 PM2021-07-13T16:06:14+5:302021-07-13T16:44:31+5:30

Punjab assembly election: पुढच्या वर्षी होणाऱ्या पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी सिद्धूंच्या विधानाने चर्चांना उधाण आले आहे

'Only AAP recognized my vision for Punjab', says navjyotsigh Sidhu | Punjab: 'पंजाबबद्दल असलेलं माझं व्हिजन फक्त 'आप'ने ओळखलं', सिद्धूंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

Punjab: 'पंजाबबद्दल असलेलं माझं व्हिजन फक्त 'आप'ने ओळखलं', सिद्धूंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

Next
ठळक मुद्दे अमरिंदर सिंग आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात वर्चस्वाची लढाई सुरू आहे

नवी दिल्ली:पंजाबमध्ये पुढच्या वर्षी विधानसभा निवडणूक(Punjab Assembly Election)  होत आहे. निवडणुकीला फक्त एक वर्ष उरलेलं असतानाही, मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग(CM Captain Amarinder Singh)  आणि नवज्योतसिंग सिद्धू(Navjot Singh Sidhu) यांच्यातील वाद शमताना दिसत नाहीये. यातच आता सिद्धू यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे हा वाद अजूनच वाढण्याची शक्यता असून, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

ट्विटरवरुन सिद्धू यांनी पंजाबमधील विरोधी पक्ष असलेल्या आम आदमी पार्टी(AAP)चे कौतुक केले. तसेच, पंजाबबद्दल असलेल्या माझ्या व्हिजनला आणि कामाला फक्त आपनेच ओळखले असेही म्हटले. त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत. याशिवाय, 2017 पासूनच मी राज्यातील ड्रग्स, शेतकरी, विज, भ्रष्टाचार इत्यादी मुद्द्यांवर लढत असून, पंजाबच्या जनतेने माझे काम पाहिले आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

अमरिंदर आणि सिद्धू यांच्यात वर्चस्वाची लढाई

पंजाबमध्ये सध्या काँग्रेसचे सरकार आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग पंजाबचे मुख्यमंत्री आहे. तर, नवज्योतसिंग सिद्धू माजी मंत्री राहिले आहेत. या दोघांमध्ये सध्या वर्चस्वाची लढाई सुरू आहे. सिद्धूंना आपल्या पक्षात महत्वाचे पद हवंय, तर अमरिंदर सिंग यांना सिद्धूंना कोणतेच पद मिळू द्यायचे नाही. या दोघांचा वाद दिल्लीत ज्येष्ठ नेत्यांपर्यंत पोहचला आहे. याप्रकरणी काँग्रेसने तीन सदस्यांची समिती स्थापन करुन या दोन्ही नेत्यांमधील वाद मिटवण्याचा प्रयत्न केलाय. पण, दोघांपैकी कोणीच झुकायला तयार नाही.  

सुनील जाखड यांचे पद धोक्यात ?
दरम्यान, या दोन्ही नेत्यांच्या वादात पंजाबचे प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांच्या पदाचा बळी जाऊ शकतो. पक्ष राज्यातील नेतृत्वात बदल करण्याच्या तयारीत असून, सिद्धू यांना प्रदेशाध्यक्ष पद देणार असल्याची चर्चा सुरू आहे. काँग्रेसचे महासचिव आणि पंजाबचे प्रभारी हरीश रावत यांनी याबाबत माहिती दिली आहे. 

Web Title: 'Only AAP recognized my vision for Punjab', says navjyotsigh Sidhu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.