काही क्षणांसाठी थेट मृत्यूलाच आव्हान ! भाग २
By admin | Published: December 28, 2014 11:40 PM
चालत्या गाडीत चढणे-उतरणे टाळा
चालत्या गाडीत चढणे-उतरणे टाळाचालत्या गाडीत चढणे, उतरणे किंवा गाडीच्या पायदानावर बसून प्रवास करणे हा रेल्वे ॲक्ट १५६ नुसार गुन्हा आहे. अनेकदा रेल्वेगाडी सुटल्यानंतर प्रवासी धावत जाऊन गाडी पकडतात. अशा वेळी एखाद्या प्रसंगी प्रवाशाचा पाय घसरून तो कोचखाली आल्यास त्याच्या चिंधड्या उडण्याची शक्यता राहते. परंतू प्रवासी त्याकडे दुर्लक्ष करून साक्षात मृत्यूलाच आमंत्रण देतात. त्यामुळे रेल्वेगाडी सुटण्याच्या दहा मिनिटे आधी रेल्वेस्थानकावर पोहोचून गाडीत चढण्याची गरज आहे. प्रवाशांनी रेल्वेच्या नियमांचे पालन करून आपल्या जीविताचे रक्षण करण्याची गरज आहे.रेल्वे रुळ ओलांडणे मृत्यूला आमंत्रणरेल्वे रुळ ओलांडून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाणे रेल्वे ॲक्ट १४७ नुसार गुन्हा आहे. अनेकदा प्रवासी फूट ओव्हरब्रीज टाळून रेल्वे रुळ ओलांडतात. रेल्वे रुळावरून जाण्याचा पहिला हक्क रेल्वेगाडीचा आहे. परंतू अनेक प्रवासी त्याकडे दुर्लक्ष करून थेट रेल्वे रुळ ओलांडतात. रुळावरून येणाऱ्या रेल्वेगाडीखाली चेंगरून जीवितहानी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांनी एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी फूट ओव्हरब्रीजचा वापर करणे गरजेचे आहे.बर्थचे आमिष दाखवून लूटअनेकदा प्रवाशांचे तिकीट कन्फर्म नसल्यामुळे त्यांना बर्थ मिळत नाही. परंतू असे प्रवासी हेरून रेल्वेस्थानकावर भामटे त्यांना हेरतात. बर्थ पाहिजे का अशी विचारणा करतात. प्रवाशाने होय म्हटले की त्यांच्याकडून पैसे उकळतात, बर्थ क्रमांक घेऊन येतो म्हणून त्यांना एका ठिकाणी बसवतात. मात्र त्यानंतर त्या प्रवाशाचे तिकीट रद्द करून आणि बर्थ मिळवून देण्याचे पैसे घेऊन पळ काढतात. अशा प्रकारे अनेक प्रवाशांची लूट झाल्याची उदाहरणे आहेत. रेल्वेगाडीचा चार्ट तयार झाल्यानंतर टीसीशिवाय कुणीही बर्थ मिळवून देऊ शकत नाही. परंतू ही साधी बाब प्रवाशांच्या लक्षात येत नसल्यामुळे त्यांची फसवणूक होते.धार्मिक भावनांना हात घालून फसवणूकअनेकदा सोबत प्रवास करीत असलेल्या सह प्रवाशांकडूनही लूट होऊ शकते. असे प्रवासी गप्पा मारून आपल्याला बोलते करतात. तीर्थयात्रेला गेल्याचे सांगतात आणि थोड्याच वेळात जवळच्या प्रसादाच्या डब्यातून प्रसाद खाण्यास देतात. अनेकजण व्यक्ती धार्मिक असल्यामुळे हा प्रसाद घेऊन त्वरित खातात. परंतु सावधान प्रसादाच्या नावाखाली दिलेल्या खाद्यपदार्थातही गंुगीचे औषध असण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रवासात कुणी देवाचा प्रसाद दिला तरीसुद्धा तो टाळणे हाच सुरक्षेच्या दृष्टीने योग्य उपाय आहे.