ऑनलाइन लोकमत
इलाहाबाद, दि. १३ : देशातील जातीयवाद थांबेल तेव्हाच देशाचा खरा विकास होईल, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. ते इलाहाबादमधील सभेत बोलत होते. विकाससाची नवी परिभाषा घेउन सत्तेत आलेल्या भाजपा सरकारने केलेल्या २ वर्षाच्या कामकाजाचा आढावाच मोदी यांनी जाहीर सभेत दिला. भाजपाची राष्ट्रीय कार्यकारिणीची २ दिवसीय बैठक संपल्यानंतर आज इलाहाबादमध्ये रॅलीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांची जाहीर सभा झाली. यावेळी बोलताना त्यांनी उत्तरप्रदेशच्या जनतेच आभार मानले. उत्तर प्रदेशात पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात घेता, भाजपाने आपल्या प्रचारची सुरवातच केली असे म्हणावे लागेल.
(कुठे छत्रपती शिवाजी महाराज नी कुठे गांधी घराणे - पंतप्रधान मोदींचा नाव न घेता वार)
पुढे बोलताना ते म्हणाले, देशाच्या प्रत्येक कानाकोप-यात भाजपला समर्थन मिळत असून, केंद्र सरकारमध्ये उत्तर प्रदेशचा दबदबा आहे. पंतप्रधान आणि गृहमंत्री उत्तर प्रदेशमधलेचं असल्यानं उत्तर प्रदेशचा विकास निश्चत आहे, उत्तर प्रदेशमध्येही आसामसारखा बदल घडला पाहिजे, असंही ते म्हणाले. या सभेला लालकृष्ण आडवाडी, अमित शहा, राजनाथ सिंह, नितीन गडकरीसह अनेक भाजपाच्या दिग्गज नेत्यांची उपस्थिती होती.
मोदी यांच्या भाषणाती महत्वाचे मुद्दे -
युरीया साठी शेतकऱ्यांना रात्रभर वाट पाहवी लागत होती, कधीकधी त्यांच्यावर लाठी हल्लाही होत होता. स्वातंत्र्यानंतर आमच्या सरकारच्या काळात सर्वात जास्त युरीया निर्मिती करण्यात आली आहे.
उत्तर प्रदेशात बीएसी आणि एसपी एकमेकांविरुद्ध भ्रष्टाचाराचा आरोप करतात परंतु सत्तेत आल्यानंतर कारवाई करीत नाही.
उत्तर प्रदेश भ्रष्टाचाराचे आगार बनले असे सांगून नरेंद्र मोदी यांची मुलायम-मायावती यांच्यावर टीका.
स्वातंत्र्यानंतर आमच्या सरकारच्या काळात विज निर्मिती करण्याच काम झालं आहे.
स्वातंत्र्यानंतर आम्ही शेतकऱ्यांसाठी विमा योजना आमलात आणली.
उत्तर प्रदेशमधील १५२९ गावात स्वतंत्र्यानंतरही विज नव्हती, १३५३ गावामध्ये आम्ही २ वर्षात विज उपल्ब्ध करुन दिली आहे.
सर्वात जास्त पंतप्रधान उत्तरप्रदेशने दिले
ज्या राज्यात आम्हाला सत्ता मिळाली त्या राज्यांचा आम्ही विकास केला आहे, महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश आणि गोव्याचा विकास पहा.
आम्ही प्रत्येक क्षेत्रात चागंल काम केलं आहे.
आम्हाला ५ वर्ष सत्ता द्या, यामध्ये आम्ही आपलं कोणतही नुकसान केलं तर आम्हाला लाथ मारुन बाहेर काढा.
भारत माता की जय बोलत नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाचा शेवट केला.