शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
3
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
4
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
5
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
6
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
7
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
8
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
13
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
14
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
15
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
16
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
17
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
20
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम

सोशल डिस्टन्सिंग पाळणाऱ्या भक्तांनाच मंदिर प्रवेश; विविध उपक्रम रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2020 2:00 AM

मंगळागौर साजरी न करण्याचा महिलांचा निर्णय

- अनिरुद्ध पाटील।बोर्डी : श्रावण हा व्रत-वैकल्यांचा महिना असून या काळात भक्त मंदिरात जाऊन दर्शनाचा लाभ घेतात. यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर समित्यांकडून कठोर भूमिका घेण्यात आली असून सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करणाºया भक्तांनाच शासनाच्या नियमांच्या अधीन राहून मंदिर प्रवेश देण्याची भूमिका घेतली आहे, तर बोडीर्तील महिलांनी मंगळागौर साजरी न करण्याचे ठरविले आहे.

डहाणू तालुक्यात मोठ्या प्रमाणात शिव मंदिरे असून श्रावण महिन्यात येथे भक्तांची मांदियाळी दिसून येते. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संसर्गाचा धोका लक्षात घेता घरात राहून सुरक्षित राहण्याचे आवाहन शासनाने केले आहे. याकरिता तालुक्यातील विविध मंदिर समितीकडून सोशल डिस्टन्सिंग नियमांचे पालन करणाºया भक्तांनाच दर्शनाचा लाभ देण्याचे ठरवले आहे. डहाणू फोर्ट येथे चारशे वर्ष जुने पेशवेकालीन सिद्धेश्वर मंदिर आहे. दरवर्षी श्रावण महिन्यात या स्वयंभू मंदिरात भक्तांची गर्दी होते.

बर्फाचे शिवलिंग साकारण्यासह, मातीचे हजार शिवलिंग असे विविध उपक्रम राबवले जातात. या मंदिरात साधारणत: शंभर भक्त दर्शनाचा लाभ घेऊ शकतील एवढी जागा आहे. मात्र सोशल डिस्टन्सिंग नियमांचे पालन करणाºया भक्तांनाच मंदिर प्रवेश दिला जाईल, अशी माहिती शंभू महाराज यांनी दिली. तर पारनाका येथील श्री विश्वेश्वर महाराज मंदिरात कोरोना काळात पालन करावयाचे नियम सूचना फलक व भित्तिपत्रकाद्वारे लिहिले असून भक्तांनी त्याचे काटेकोर पालन करणे अनिवार्य आहे. तर श्री महिला सेवा मंडळातर्फे श्रावण महिन्यातील भजन-कीर्तनाचे केले जाणारे आयोजन या वेळी रद्द केल्याची माहिती या मंडळाच्या सेक्रेटरी राधिका पोंदा यांनी दिली.

दरम्यान, बोर्डीतील स्फूर्ती महिला क्लबतर्फे दरवर्षी सुमारे सव्वाशे महिलांकडून मंगळागौरीचा कार्यक्रम साजरा केला जात होता, मात्र कोरोनाचा कहर पाहता यंदा कार्यक्रम रद्द केल्याची माहिती संचालिका उर्मिला करमरकर यांनी दिली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस