जयपूर : राजस्थानची एकूण लोकसंख्या ६.८५ कोटी असून त्यात एक ज्यू आणि पारसी समुदायाच्या ८५ लोकांचा समावेश आहे. धार्मिक जनगणनेच्या अहवालातून ही माहिती समोर आली.पारसी लोक ब्रिटीश राजवटीत १०० वर्षांपूर्वी राजस्थानात आले. मात्र, आता हा समुदाय राजस्थानातून विलुप्त होण्याच्या मार्गावर आहे. पारसी लोक रेल्वेमार्गाच्या कामासाठी अजमेर येथे आले होते. १८७० ते १८९० दरम्यान येथील पारसी लोकांची संख्या ३००च्या आसपास होती. ती २०११ मध्ये घटून ८५ झाली. अजमेरच्या पुष्कर येथे ज्यू धर्मियांचा चांगला राबता होता. १९४८ मध्ये आधुनिक इस्रायलची निर्मीती होण्याच्या आधीपासून ज्यू लोक येथे रहात होते. गेल्या काही दशकांपासून पुष्कर येथे अन्य धर्मियांच्या तुलनेत ज्यू लोक अधिक संख्येने येत आहेत. पुष्कार हे भारतातील ज्यूंच्या प्रमुख नऊ केंद्रांपैकी एक केंद्र आहे. संपूर्ण देशात ज्यू नागरिकांची संख्या ५०० हून थोडी अधिक आहे. राजस्थानचा नागरिक असलेल्या एकमेव ज्यू व्यक्तीचा छडा लागू शकला नाही. हडोती विभागात एकेकाळी बौद्ध धर्म प्रचंड पसरला होता. मात्र, या धर्माचे आता केवळ १२ हजार अनुयायी येथे आहेत. (वृत्तसंस्था)
राजस्थानात एकच ज्यू, ८५ पारसी
By admin | Published: September 11, 2016 6:56 AM