देशातील राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तलंगणामध्ये झालेल्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. या राज्यांपैकी राजस्थान, मध्येप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजपला बंपर विजय मिळाला आहे. यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभिनंदन करत, "देशात केवळ एकच गॅरंटी आहे, ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीच गॅरंटी. हे या निवडणुकीने सिद्ध केले आहे," असे जेपी नड्डा यांनी म्हटले आहे. ते दिल्ली येथील भाजप मुख्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित करत होते.
नड्डा म्हणाले, "देशात कोणतीही निवडणूक असो अथवा कुठलेही काम असो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच पुढाकार नेतृत्व केले आहे. नेहमीच ते पूर्ण केले आहे. त्यांनी अनेक निवडणुकीत विजय मिळवून दिला आहे. असे आपले यशस्वी पंतप्रधान आहेत. या निवडणुकांच्या निकालांनी स्पष्ट संदेश दिला आहे की, गाव, गरीब, वंचित, पीडित, शोषित, आदीवासी बंधी. यांना कुणी सन्मानाने मुख्य प्रवाहात आणू शकतो, तर ते दुसरे तिसरे कुणी नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. यावर या सर्वांना विश्वास आहे."
देशात केवळ एकच गॅरंटी -"देशात केवळ एकच गॅरंटी आहे, ती म्हणजे नरेंद्र मोदी यांचीच गॅरंटी आहे. हे या निवडणुकीने सिद्ध केले आहे. हे निकाल आणखी एक संदेश देतात, ती म्हणजे, मोदी है तो मुमकीन हे. हेही आपल्याला स्पष्टपणे दिसते," अशा शब्दात नड्डा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रशन्सा केली.
मोदीचा विकासाचा मुद्दा ठरला भारी - नड्डा म्हणाले, "मित्रांनो, या निवडणुकीतून आणखी एक संदेश मिळतो, इंडिया अलायन्सने ज्या पद्धतीने जातीयवाद पसरवण्याचा प्रयत्न केला, ज्या पद्धतीने समाज खंडित करण्याचा प्रयत्न केला, ज्या पद्धतीने देशात फूट पाडण्याचा प्रयत्न केला आणि तुष्टिकरणाचे राजकारण पुढे नेण्याचे काम केले. यावर मोदीजींच्या विकासाचा मुद्दा भारी ठरला आहे. हेही आपण लक्षात ठेवायला हवे. देशाने विकासाला समोर ठेवून या निवडणूक निकालांवर मोहर उमटवली आहे."
...पण हे विसरतात की, देशाचे पंतप्रधान औबीसी समुदायातील आहेत -इंडिया अलायन्सने ओबीसीच्या घोषणा देत आहेत. पण हे विसरतात की, आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे औबीसी समुदायातील आहेत. सर्वांच्या विकासाचा प्रण करून, सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास या पुढे नेण्याचे काम केले आहे. मात्र, काँग्रेसच्या लोकांनी ज्या पद्धतीने पंतप्रधान मोदींसंदर्भात अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन अपशब्द वापरले, तेव्हा त्यांना कळले नाही का, की मोदीजींसाठी वापरलेले अपशब्द म्हणजे, ओबीसी समाजावर भाष्य करण्यासारखे आहे? असा सवालही यावेळी नड्डा यांनी केला.
रणनीती पडद्याआडचा विषय असतो -भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष म्हणून, या यशासाठी मी राजस्थान मध्यप्रदेश छत्तीसगड आणि तेलंगणाच्या जनतेचे मनापासून आभार मानतो. याच बरोबर मी आमच्या लाखो कार्यकर्त्यांनाही धन्यवाद देतो. मला पत्रकार विचारत होते की, रणणिती काय आहे? मी म्हणत होतो, रणनीती पडद्याआडचा विषय असतो. ती वेळेवरच समोर येते. माझ्या कार्यकरत्यांनी ही रणनीती अगदी योग्य पद्धतीने अंममलबजावणी केली. त्यांचे मोठे योगदान आहे. त्यासाठीही मी त्यांचे अभिनंदन करतो. आम्हाला समाजाच्या सर्वस्थरांतून मतदान झाले आहे, असेही जपी नड्डा यांनी म्हणाले.