जि.प.त १७ कर्मचार्यांच्या बदल्या प्रशासकीयमध्ये फक्त एकच बदली : आज पाणीपुरवठा, आरोग्य, लघुसिंचन विभागाच्या बदल्या
By admin | Published: May 11, 2016 12:24 AM
जळगाव : जिल्हा परिषदेमध्ये मंगळवारी बदल्यांची प्रक्रिया सुरू झाली. त्यात अर्थ, कृषि, बांधकाम आणि बाल कल्याण विभागांमध्ये मिळून १७ कर्मचार्यांच्या बदल्या झाल्या. प्रशासकीय बदल्यांचे प्रमाण अतिशय नगण्य असून, फक्त बाल कल्याण विभागामध्ये एक कर्मचार्याची प्रशासकीय बदली झाली.
जळगाव : जिल्हा परिषदेमध्ये मंगळवारी बदल्यांची प्रक्रिया सुरू झाली. त्यात अर्थ, कृषि, बांधकाम आणि बाल कल्याण विभागांमध्ये मिळून १७ कर्मचार्यांच्या बदल्या झाल्या. प्रशासकीय बदल्यांचे प्रमाण अतिशय नगण्य असून, फक्त बाल कल्याण विभागामध्ये एक कर्मचार्याची प्रशासकीय बदली झाली. सकाळी छत्रपती शाहू सभागृहामध्ये बदल्यांची कार्यवाही सुरू झाली. सीईओ आस्तिककुमार पांडेय, अतिरिक्त सीईओ संजय मस्कर आदी उपस्थित होते. बदलीसाठी अपंगत्व, आजारपणाचे कारण दिलेल्या कर्मचार्यांची आरोग्य तपासणी करण्यासाठी जिल्हा आरोग्याधिकारी डॉ.श्याम निमगडे उपस्थित होते. विविध विभागात झालेल्या बदल्यांची माहिती : अर्थ विभाग- कनिष्ठ सहायक ४, वरिष्ठ सहायक ३. कृषी विभाग- विस्तार अधिकारी ३, कृषी अधिकारी १. बांधकाम विभाग- शाखा अभियंता १, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक २. बाल कल्याण विभाग- पर्यवेक्षिका १ (प्रशासकीय), पर्यवपेक्षिका २ (विनंतीनुसार). ११ रोजी सकाळी १० वाजेपासून आरोग्य, ग्रामीण पाणीपुरवठा आणि लघुसिंचन या विभागांच्या बदल्यांना सुरुवात होणार आहे. छत्रपती शाहू सभागृहात ही प्रक्रिया होईल.