नवी दिल्ली- विवाहित महिलेबरोबर सहमतीने संबंध ठेवण्याच्या खटल्यामध्ये केवळ पुरुषालाच शिक्षा ठोठावण्याच्या भारतीय दंडविधान संहितेतील तरतुदीवर सर्वोच्च न्यायालयाने बोट ठेवले आहे. या 157 वर्षे जुन्या कायद्याची घटनात्मक वैधता तपासायाला हवी असे संकेत सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.यासंदर्भात दाखल झालेल्या एका याचिकेवर सरन्यायाधीश दीपक मिश्रा आणि न्यायाधीश ए.एम. खानविलकर व डी. वाय. चंद्रचूड यांनी केंद्र सरकारचे याबाबत मत मागवले आहे. मुळचे केरळचे आणि सध्या इटलीत ट्रेंटो येथे कामानिमित्त राहणारे जोसफ शाइन यांनी ही याचिका दाखल केली आहे. संमतीने ठेवलेल्या संबंधांमध्ये केवळ पुरुषालाच दोषी का धरले जाते आणि संबंधित विवाहित स्त्रीला यामध्ये का दोषी ठरवले जात नाही असा प्रश्न जोसेफ यांनी या याचिकेद्वारे विचारला आहे.
व्यभिचाराच्या गुन्ह्यात फक्त पुरुषालाच शिक्षा का ? सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2017 11:15 AM
विवाहित महिलेबरोबर सहमतीने संबंध ठेवण्याच्या खटल्यामध्ये केवळ पुरुषालाच शिक्षा ठोठावण्याच्या भारतीय दंडविधान संहितेतील तरतुदीवर सर्वोच्च न्यायालयाने बोट ठेवले आहे. या 157 वर्षे जुन्या कायद्याची घटनात्मक वैधता तपासायाला हवी असे संकेत सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
ठळक मुद्देया याचिकेवर सरन्यायाधीश दीपक मिश्रा आणि न्यायाधीश ए.एम. खानविलकर व डी. वाय. चंद्रचूड यांनी केंद्र सरकारचे याबाबत मत मागवले आहे. मुळचे केरळचे आणि सध्या इटलीत ट्रेंटो येथे कामानिमित्त राहणारे जोसफ शाइन यांनी ही याचिका दाखल केली आहे.