बांगला-भाषिक मुस्लिम समाजाला तेव्हाच राज्याचे मूल निवासी (खिलोंजिया) मानले जाईल, जेव्हा ते बाल-विवाह आणि बहुविवाह यांसारख्या प्रथा सोडतील, असे आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी म्हटले आहे. यापूर्वी सरमा यांनी राज्यातील बंगला भाषिक मुस्लीम समाजाला सामाजिक वाईट प्रथांसाठी जबाबदार धरले होते. या समाजातील अधिकांश लोकांचा बांगलादेशशी संबंध आहे.
सर्मा शनिवारी म्हणाले, ‘मियां (बांगला-भाषिक मुस्लीम) मूल निवासी आहेत की नाही, हा एक वेगळा मुद्दा आहे. आम्ही असे म्हणत आहोत की, जर त्यांची ‘मूल निवासी’ होण्याची इच्छा आसेल तर, आम्हाला कसलीही अडचण नाही. मात्र यासाठी त्यांना बाल विवाह आणि बहुविवाह सोडून महिलांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करावे लागेल.’
सरमा म्हणाले, आसामच्या लोकांची एक संस्कृती आहे. यात मुलींची तुलना ‘शक्ती’ (देवी) सोबत केली जाते आणि दोन-तीन वेळा लग्न करणे ही आसामची संस्कृती नाही. मी त्यांना नेहमीच सांगत असतो, 'मियां' स्वदेशी होत असतील तर हरकत नाही. मात्र, त्यांना दोन-तीन पत्नी ठेवता येणार नाहीत. ही आसामी संस्कृती नाही. सत्र (वैष्णव मठ) भूमीवर अतिक्रमण करून कुणाला मूल निवासी कसे व्हायचे आहे.’
जर बांगला भाषी मुस्लीम आसामी प्रथा परंपरांचे पालन करू शकत असतील तर, त्यांनाही ‘स्वदेशी’ मानले जाईल, असे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमान यांनी म्हटले आहे.