बंगलोर: नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात देशभरात आंदोलन सुरु आहे. तर याच कायद्याच्या समर्थनार्थ भाजपकडून रैली काढण्यात येत आहे. सोमवारी बंगळुरु दक्षिणमध्ये भाजपकडून काढण्यात आलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ बोलताना भाजपच्या खासदाराने या कायद्याला विरोध करणाऱ्या आंदोलकांची खिल्ली उडवली. देशातील अशिक्षित व पंक्चर काढणारी लोकचं फक्त या कायद्याला विरोध करत असल्याचे विधान बंगलोरमधील खासदार तेजस्वी सूर्या यांनी केले आहे.
यावेळी बोलताना खासदार तेजस्वी सूर्या म्हणाले की, बंगलोरमधील IT आणि BT सेक्टरमध्ये काम करणारे लोकं देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी हातभार लावत आहे. यात वकील,बँक कर्मचारी आणि सामन्य व्यक्ती सुद्धा आहे. त्यामुळे हे सर्व लोकं नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ एकत्र आले आहे. मात्र अशिक्षित आणि पंक्चर काढणारी लोकंच या कायद्याला विरोध करत असल्याचे खासदार तेजस्वी सूर्या म्हणाले.
तर पुढे बोलताना ते हे सुद्धा म्हणाले की, कमकुवत आणि प्रभावहीन धर्मनिरपेक्षतेला या देशात कोणतेही स्थान नाही. आम्ही एक नवीन भारत बनवत असल्याचे खासदार सूर्या म्हणाले. याचवेळी त्यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्यांवर सुद्धा टीका केली. त्यांच्या हा व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्याप्रमाणावर व्हायरल झाला आहे.
त्यांच्या या वक्तव्यानंतर आता काँग्रेसकडून सुद्धा उत्तर देण्यात आला आहे. काँग्रेसचे नेते श्रीवास्तव वाई.बी यांनी म्हंटल आहे की, खासदार तेजस्वी सूर्या हे एका श्रीमंत कुटुंबातून आहेत. CAA विरोधात आंदोलन करणार्यांना त्यांनी कोणत्या अधिकारातून अशिक्षित आणि पंक्चर काढणारे म्हटले ? मला हे जाणून घ्यायचे आहे. तसेच यापुढे गरीब लोकांना आंदोलन करण्याचा अधिकार नाही का? असा प्रश्न सुद्धा त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.