हरयाणाच्या सिरसा जिल्ह्यातील रस्त्यांवरुन ये-जा करणाऱ्या एका ट्रकची जोरदार चर्चा आहे. गुजरातच्या कांडला पोर्ट येथून हा ट्रक जवळपास १० महिन्यांपूर्वी रवाना झाला होता. पंजाबधील रिफायनरीत हा ट्रक जाणार आहे. या ट्रकची खासियात म्हणजे ट्रकमध्ये १, २ किंवा १० टायर नसून तब्बल ४१६ टायर जोडले आहेत. म्हणूनच या ट्रकला बाहुबली ट्रक असं म्हटलं जात आहे. पंजाबच्या भटिंडा येथील एका रिफायनरीमध्ये हा ट्रक पोहोचवण्यात येणार आहे.
बाहुबली ट्रकवरुन एक इक्विपमेंट लोड करण्यात आलं आहे. भटिंडा येथील रिफायनरीमध्ये हे इक्विपमेंट लावण्यात येईल. या ४१६ टायरच्या बाहुबली ट्रकला ओढण्यासाठी पुढे दोन ट्रक आणि मागे २ ट्रक जोडण्यात आले आहे. विशेष म्हणजे ३९ मीटर लांब हा ट्रक असून ९ ते १० महिन्यांपासून त्याचा प्रवास सुरू आहे. अनेकवेळा हवामानाच्या कारणास्तव ट्रकचा प्रवास थांबलाही होता. आता, हा ट्रक सिरसा जिल्ह्यात पोहोचला आहे.
या बाहुबली ट्रकसोबत २५ ते ३० लोक असून टेक्निकल इंजार्च रविंद्र पांण्डेय हेही तांत्रिक इंजिनिअर म्हणून सोबत आहेत. दररोज फक्त दिवसाच हा ट्रक वाहतूक करत असून दररोज १२ किमीपर्यंतचा रस्ता पूर्ण करतो. सध्या, ज्या रस्त्यावरुन ट्रकची वाहतूक होते. तेथील भागात या बाहुबली ट्रकचीच चर्चा रंगलेली असते.