शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
3
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, उगाच नाक खुपसू नये”; संजय राऊतांची टीका
4
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
5
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
6
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
7
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
8
Maharashtra Election 2024 Live Updates: निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्रकाश आंबेडकर यांच्या बॅगची तपासणी
9
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
10
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
11
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
12
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
13
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
14
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
15
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
16
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
17
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
18
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
19
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
20
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा

मतदानदिनी राजकीय जाहिराती प्रसिद्ध करण्याचा मार्ग खुला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2019 4:39 AM

मतदानाच्या दिवशी राजकीय पक्ष, उमेदवारांच्या जाहिराती वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध करण्यावर बंदी घालण्याच्या निवडणूक आयोगाच्या प्रस्तावावर विधि मंत्रालयाने अद्याप काहीच निर्णय घेतलेला नाही.

नवी दिल्ली : मतदानाच्या दिवशी राजकीय पक्ष, उमेदवारांच्या जाहिराती वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध करण्यावर बंदी घालण्याच्या निवडणूक आयोगाच्या प्रस्तावावर विधि मंत्रालयाने अद्याप काहीच निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकांत या प्रस्तावाची अंमलबजावणी होणार नाही असे सूत्रांनी सांगितले.हा प्रस्ताव अंमलात आणायचा झाल्यास त्यासाठी लोकप्रतिनिधीत्व कायद्यात बदल करावा लागेल. त्याबाबत राजकीय मतैक्य होणे गरजेचे आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी खूप कमी होता. या गोष्टी लक्षात घेऊन हा कायदादुरुस्तीचा प्रस्ताव विधी मंत्रालयाने केंद्रीय मंत्रिमंडळासमोर सादर केला नाही.मतदानाच्या आधी शेवटच्या ४८ तासांत राजकीय पक्षांनी कोणत्या गोष्टी टाळाव्यात यासंदर्भात तरतूद करण्यास कायद्यामध्ये काय बदल करता येतील याचा विचार करण्यास एक समिती नेमली होती. मतदानाच्या दिवशी वृत्तपत्रांमध्ये राजकीय जाहिराती प्रसिद्ध करण्यावर बंदी घालावी असे या समितीने सुचविले होते.मतदानाच्या आधी ४८ तासांत जाहिराती किंवा निवडणुकीशी संबंधित प्रसिद्धी करणारे कार्यक्रम दाखविण्यावर दूरचित्रवाहिन्यांना याआधीच मनाई करण्यात आली आहे. २०१५ साली झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकांत आयोगाने अशी बंदी घातली होती.