ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 16 - नोटाबंदीच्या काळात म्हणजे 9 नोव्हेंबर ते 30 डिसेंबर 2016 या काळात बँक खात्यांमध्ये मोठ्या रकमांचा भरणा करणाऱ्यांपैकी ज्यांचे व्यवहार त्यांच्या ताज्या प्राप्तिकर रिटनर्शी मेळ खात नाहीत असे 18 लाख करदाते प्राप्तिकर विभागाने हुडकून काढले असून त्यापैकी 9 लाख बँक खाती प्राप्तिकर विभागाच्या रडारावर आहेत.
नोटाबंदीच्या निर्णयानंतर जुन्या नोटा बँकेत जमा करण्यासाठी लोकांची झुंबड उडाली होती. यादरम्यान अनेक नवी खाती बँकमध्ये उघडण्यात आली होती. नोटाबंदीनंतर 18 लाख बँक खाती प्राप्तिकर विभागाच्या रडारवर आले आहेत. या 18 लाख खातेदारांचे टॅक्स प्रोफाईल आणि त्यांनी जमा केलेल्या रकमेत अंतर असल्यामुळे या खातेदारांना एसएमएस आणि ई-मेल पाठवण्यात आले आहेत, 18 लाखापैकी 9 लाख बँक खाती प्राप्तिकर विभागाच्या संशयाच्या भोवऱ्यात आली आहेत. 9 लाख खात्याची चौकशी होणार असून दोषी आढळल्यास 31 मार्चनंतर खातेदारावर कारवाई होण्याची शक्यता आहे. ऑपरेशन क्लीन मनी अंतर्गत प्राप्तिकर विभागाने 18 लाख बँक खातेदारांना नोटीस पाठवण्यात आले होते. पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटाबर बंदी घालण्यात आल्यानंतर 50 दिवसातील बँकाचा सर्व व्यवहार प्रप्तिकर विभागाच्या रडारावर आहे. या 50 दिवसात पाच लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम जमा करणाऱ्या बँक खात्यांचा समावेश मोठ्याप्रमाणात आहे.