श्रीनगर - काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात सुरू असलेल्या लष्कराच्या मोहिमेला सोमवारी मोठे यश मिळाले. बारामुल्ला येथील लाडोरा येथे लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत लष्कराने जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा ऑपरेशन कमांडर खालिद याला लष्कराने कंठस्नान घातले. खालिद हा बीएसएफ कॅम्पवर झालेल्या तळावरील हल्ल्याचा मास्टर माईंड होता. काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील लाडोरा येथे लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली. या चकमकीत लष्कराने कुख्यात दहशतवादी खालिद याला एका शाळेमध्ये घेरले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याआधी झालेल्या चकमकीत खालिद जखमी झाला होता. पायाला जखम झाल्याने तो याच परिसरात अडकला होता. अखेर आज झालेल्या चकमकीत लष्कराने त्याला ठार मारले. खालिद हा पाकिस्तानी नागरिक होता.
दरम्यान, भारत - पाकिस्तान सीमारेषेवर असणारे भारतीय लष्कराचे जवान दिवसाला पाच ते सहा दहशतवाद्यांचा खात्मा करत आहेत, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली आहे. तसंच पाकिस्तानने गोळीबार केल्यास त्यांना योग्य ते उत्तर द्या, असा आदेश दिला असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. राजनाथ सिंह यांनी सांगितलं की, 'भारतीय जवानांना पाकिस्तानवर गोळीबार न करण्याचा आदेश दिला आहे. मात्र जर त्यांनी गोळीबार केल्यास असंख्य गोळ्यांचा वर्षाव करत योग्य ते उत्तर द्या असा आदेश दिला आहे'.
यावेळी राजनाथ सिंह यांनी डोकलाम मुद्द्यावरही भाष्य केलं. 'भारत आता अजिबात दुबळा देश नाही, एक मजबूत देश झाला आहे. चीनसोबत वादग्रस्त मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी भारताचा नेहमीच पुढाकार होता', असं राजनाथ सिंह बोलले आहेत.
चीनने डोकलाम भागात रस्ता बांधण्याची तयारी पुन्हा सुरू करताच, भारत- चीन सीमेवरील सर्व महत्त्वाच्या खिंडींजवळ जवळपास १00 नवे रस्ते बांधण्याची रणनीती भारत सरकारने तयार केली आहे. संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी दुपारी डोकलाम नाथु-ला क्षेत्राचे हवाई सर्वेक्षण केले. सीमावर्ती भागात पहिल्या टप्प्यात महत्त्वाचे २५ रस्ते, तर दुसºया व तिसºया टप्यात प्रत्येकी ५0 नवे रस्ते तयार होणार असल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांकडून या दौºयाच्या निमित्ताने प्राप्त झाली.