श्रीनगर : शहराच्या करण नगरमध्ये इमारतीत लपलेल्या २ अतिरेक्यांना सुरक्षा जवानांनी ठार केले आहे. अतिरेक्यांनी श्रीनगरमध्ये सोमवारी सीआरपीएफच्या कॅम्पवर हल्ल्याचा प्रयत्न केला होता. सुरक्षा दलाने तो उधळल्यानंतर अतिरेकी जवळच्या इमारतीत लपले होते.सुरक्षा दल व अतिरेक्यांत मंगळवारी सकाळी पुन्हा सुरू झाली. त्यात दोन्ही अतिरेकी मारले गेले. जैश-ए-मोहम्मदने जम्मूच्या सुंजवा भागात लष्कराच्या कॅम्पवर हल्ला केल्याच्या २ दिवसांनंतर पुन्हा श्रीनगरमधील हल्ल्याचा प्रयत्न झाला.सुंजवा हल्ल्यात सैन्याचे सात ७ जवान शहीद झाले व एका नागरिकाचा मृत्यू झाला. त्या कारवाईत तिन्ही अतिरेकी ठार झाले होते. काश्मिरातील सुंजवा लष्करी तळावर झालेल्या हल्ल्यातील शहीद सैनिकांची संख्या सातवर पोहोचली आहे. या चकमकीत ६ जवानशहीद झाले होते. मंगळवारी आणखी एका सैनिकाचा मृतदेह लष्करी तळावर चकमक झालेल्या ठिकाणी सापडला. आजच्या चकमकीमुळे शहरातील लोकांवर अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत. या चकमकीत सोमवारी सीआरपीएफचा एक जवान शहीद झाला, तर एक पोलीस जखमी झाला आहे. एका पोलीस अधिकाºयाने सांगितले की, कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी हे प्रतिबंध लावण्यात आले आहेत.कॅम्पजवळील कामांमुळे समस्याजम्मू : लष्कराच्या कॅम्पजवळ होणारी बांधकामे ही समस्या आहे, असे मत संरक्षणमंत्री निर्मला सीतारमन यांनी व्यक्त केले. त्या म्हणाल्या की, देशभरात होणारी अशी बांधकामे हटविणे अवघड होत आहे. मात्र, त्यावर तोडगा काढला जाईल. सुंजवातील हल्ल्यानंतर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी संरक्षणमंत्री येथे आल्या आहेत. या हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचे सांगत, त्या म्हणाल्या की, पाकिस्तानला याची किंमत चुकवावी लागेल. दगडफेक करणाºया जमावाबाबत विचारले असता, त्या म्हणाल्या की, पहिल्या गुन्ह्यासाठी राज्य सरकारने त्यांना माफी दिली आहे.
श्रीनगरमधील आॅपरेशन फत्ते! दोन अतिरेक्यांचा केला खात्मा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 2:25 AM