Gold Siezed: देशात सोन्याची तस्करी रोखण्यासाठी सरकार मोठ्या प्रमाणात काम करत आहे. या दरम्यान डीआरआय मोठे यश मिळाले आहे. ऑपरेशन 'गोल्ड रश' अंतर्गत डीआरआयने 65.46 किलो सोने जप्त केले आहे. हे सोने अंदाजे 33 कोटी रुपये असण्याची शक्यता आहे. ईशान्येकडील मिझोराममार्गे भारतभर सोन्याची तस्करी केली जात होती.
गुप्त माहितीच्या आधारावर डीआरआयने ऑपरेशन गोल्ड रश सुरू केले होते. या अंतर्गत मुंबई, पाटणा आणि दिल्ली येथे 65.46 किलो सोने जप्त करण्यात आले आहे. ही अलीकडच्या काळातील सर्वात मोठ्या कारवाईंपैकी एक आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाने जप्त केलेल्या सोन्याची किंमत सुमारे 33 कोटी असल्याचे सांगितले जात आहे.
कुठे झाली कारवाई?विशेष म्हणजे जप्त केलेल्या सोन्यात 394 सोन्याच्या कांड्या आहेत, ज्यांची ईशान्येकडील देशांतून तस्करी केली जात होती. हे सिंडिकेट मिझोराममधून देशांतर्गत कुरिअरचा वापर करत होते. डीआरआयने 'ऑपरेशन गोल्ड रश' अंतर्गत ही कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सर्वात पहिली कारवाई मुंबईत करण्यात आली, ज्यामध्ये 20 किलो सोने जप्त करण्यात आले आहे.
दुसरी कारवाई बिहारमधील होती, ज्यात एका लॉजिस्टिक कंपनीच्या गोदामातून 172 सोन्याच्या कांड्या जप्त करण्यात आल्या. याचे वजन सुमारे 29 किलो आणि किंमत 15 कोटी आहे. तिसरी कारवाई दिल्लीत करण्यात आली आणि सुमारे 9 कोटी रुपयांचे सोने जप्त करण्यात आले. कुरिअर मार्गे सोन्याची तस्करी करणाऱ्या या संपूर्ण सिंडिकेटचा पर्दाफाश झाला आहे.