शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
5
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
6
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
7
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
8
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
9
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
10
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
11
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
12
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
13
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
15
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
16
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
17
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
18
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

होमी भाभांच्या अपघाती मृत्यूमागे अमेरिकी गुप्तचर यंत्रणा ?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2017 1:20 PM

भारताच्या अणुसंशोधनाचे जनक होमी भाभा यांच्या अपघाती मृत्यूमागे अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा सीआयएचा हात असल्याचा दावा TBRNews.org वेबसाइटनं केला आहे.

ठळक मुद्देहोमी भाभा यांच्या अपघाती मृत्यूमागे अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा सीआयएचा हात असल्याचा दावा TBRNews.org वेबसाइटनं केला भारताने 60च्या दशकात अणुबॉम्ब बनवण्याची तयारी केली होती, असं रॉबर्ट टी क्राओली बोलल्याची माहिती या वेबसाइटनं दिली होती. सीआयएचे अधिकारी रॉबर्ट टी क्राओली यांना होमी भाभांच्या अणुबॉम्ब बनवण्याच्या कार्यक्रमाची भीती होती

नवी दिल्ली, दि. 31 - भारताच्या अणुसंशोधनाचे जनक होमी भाभा यांच्या अपघाती मृत्यूमागे अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा सीआयएचा हात असल्याचा दावा TBRNews.org वेबसाइटनं केला आहे. फ्रान्सच्या आल्प्स पर्वतराजीत माँट ब्लान्क येथे 24 जानेवारी 1966 रोजी एअर इंडियाचे जे विमान कोसळले त्या विमानात भारताचे प्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ होमी जहांगीर भाभासुद्धा होते. त्यांचासुद्धा या अपघातात मृत्यू झाला. मात्र आता हा अपघात अमेरिकी गुप्तचर यंत्रणा सीआयएनं घडवून आणल्याचा दावा TBRNews.org या वेबसाइटनं केल्यानं एकच खळबळ उडाली आहे.फ्रान्सच्या आल्प्स पर्वतराजीत माँट ब्लान्क येथे मानवी शरीराचे अवशेष सापडले होते. हे अवशेष एअर इंडियाच्या दुर्घटनाग्रस्त विमानातील प्रवाशांचे असण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली होती. 50 वर्षांपूर्वी एअर इंडियाची दोन प्रवासी विमाने या भागात कोसळली होती.  विमान अपघातानंतर दुर्घटनास्थळी डॅनियल रॉची यांचे बॉसन्स ग्लेशिअरमध्ये अनेक वर्षापासून शोधकार्य सुरू होते. गुरुवारी त्यांना हे अवशेष सापडले. जानेवारी 1966 मध्ये मुंबईहून न्यूयॉर्कला निघालेले एअर इंडियाचे बोईंग 707 विमान माँट ब्लान्स इथे कोसळले होते. त्यावेळी विमानातील 117 जणांचा मृत्यू झाला होता. त्याआधी 1950 साली याच भागात एअर इंडियाचे एक विमान कोसळले होते. त्यावेळी विमानात 48 जण होते.TBRNews.org नावाच्या वेबसाइटनं होमी भाभा यांच्या अपघाती मृत्यूसंदर्भात गौप्यस्फोट केला आहे. या वेबसाइटवर 11 जुलै 2008मध्ये पत्रकार ग्रेगरी डग्लस व सीआयएचे अधिकारी रॉबर्ट टी क्राओली यांच्यातील कथित संवाद टाकण्यात आला आहे. सीआयएचे अधिकारी रॉबर्ट टी क्राओली यांना होमी भाभांच्या अणुबॉम्ब बनवण्याच्या कार्यक्रमाची भीती होती. आमच्यासमोरील समस्या तुम्हाला ठाऊक होती. भारताने 60च्या दशकात अणुबॉम्ब बनवण्याची तयारी केली होती, असं रॉबर्ट टी क्राओली बोलल्याची माहिती या वेबसाइटनं दिली होती. या सर्व संभाषणात रॉबर्ट यांनी रशियाचासुद्धा उल्लेख केला होता. रशिया भारताला अणुबॉम्ब बनवण्यासाठी मदत करत असल्याचे रॉबर्ट यांनी पत्रकार ग्रेगरी डग्लस यांना सांगितले होते, अशी माहिती या वेबसाइटवर देण्यात आली आहे. सीआयएचा अधिकारी आणि पत्रकार ग्रेगरी डग्लस यांच्या चर्चेत होमी भाभा यांचादेखील उल्लेख होता. माझ्यावर विश्वास असू द्या, ते फारच धोकादायक होते. त्यांना एक दुर्दैवी अपघात झाला. समस्या वाढवून अधिक त्रास देण्यासाठी ते व्हिएन्नाला जात होते. त्याच वेळी त्यांचं बोइंग 707 विमान दुर्घटनाग्रस्त झालं, असं पत्रकार ग्रेगरी डग्लस यांना सीआयएचे अधिकारी रॉबर्ट टी क्राओली म्हणाल्याची माहिती वेबसाइटवर देण्यात आली होती.