शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
5
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
6
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
7
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
8
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
9
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
10
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
11
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
13
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
14
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
15
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
16
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
17
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
18
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

‘डेटा अ‍ॅनालिटिक्स’कडे काँग्रेससह विरोधकांच्या प्रचार मोहिमेचे सारथ्य?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 4:47 AM

नवी दिल्ली : गुजरातच्या प्रचारात जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पाहून काँग्रेसने २0१९ च्या लोकसभा निवडणुकांचीही जोरदार तयारी चालवली आहे.

सुरेश भटेवरा नवी दिल्ली : गुजरातच्या प्रचारात जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पाहून काँग्रेसने २0१९ च्या लोकसभा निवडणुकांचीही जोरदार तयारी चालवली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह देशांतील निवडणुकांमधे लक्षवेधी विजयश्री खेचून आणण्यास कारणीभूत ठरलेल्या केंब्रिज अ‍ॅनालिटिक्स कंपनीकडे काँग्रेससह संयुक्त विरोधी पक्षांच्या आघाडीच्या रणनीतीचे काम सोपविण्याची चर्चा सध्या अंतिम टप्प्यात असल्याचे कळते. केंब्रिज अ‍ॅनालिटिक्सचे संस्थापक अलेक्झांडर या शक्यतेला अंतिम रूप देण्यासाठी गेल्या तीनमहिन्यांत दोनदा भारत दौ-यावर आले.आॅगस्टमध्ये राहुल गांधींसह निवडक काँग्रेस नेत्यांसमोर त्यांनी संकल्पनेचे सादरीकरणही केले. लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांची रणनीती ठरविण्याचे काम या कंपनीला सोपविल्यास भारताच्या राजकीय समरांगणात प्रथमच विदेशी कंपनीचा सहभाग पाहायला मिळेल.अलेक्झांडर यांच्या दौºयात काँग्रेस नेत्यांबरोबर झालेल्या बैठकांत एकमत झाले आहे. केंब्रिजची मोठी टीम त्यासाठी भारतात तळ ठोकणार आहे. तथापि, उभयतांमधे औपचारिक करार अद्याप झालेला नाही. याची दोन कारणे आहेत. केंब्रिजने आंतरराष्ट्रीय स्तरानुसार खर्चाच्या आकड्याचा जो प्रस्ताव काँग्रेसपुढे ठेवला आहे, त्यासाठी काँग्रेसला आणखी काही वेळ हवा आहे. गुजरात विधानसभेची निवडणूक पार पडल्यानंतर व काँग्रेसचे अध्यक्षपद राहुल गांधींकडे आल्यानंतरच त्या अंतिम रूप दिले जाईल, असा अंदाज आहे.>४0 निवडणुकांचा अनुभवट्रम्प यांच्या प्रचाराची ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ ही लक्षवेधी मोहीम चालवून, केंब्रिज अ‍ॅनालिटिक्सने सा-या जगाचे लक्ष वेधून घेतले. शिवाय विरोधकांचा डेटा डिकोड करून आक्रमक रितीने असा हल्ला चढवला की, विरोधकांना बॅकफूटवर यावे लागले. विविध प्रकारचे डेटा डिकोड करून माहितीच्या मुळाशी जाऊन, त्याचे वास्तव मांडण्यात केंब्रिजचा हातखंडा आहे, असे मानले जाते. जगातल्या ४0 पेक्षा अधिक निवडणुकांत केंब्रिजने आपला वेगळा ठसा उमटवला आहे.

टॅग्स :Indian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेस