नवी दिल्ली - गुजरातमध्ये 22 वर्षांपासून असलेली भाजपाची सत्ता संकटात आहे. अँटी इन्कम्बन्सीची लाट, पटेलांची नाराजी आणि राहुल गांधी, हार्दिक पटेल, जिग्नेश मेवाणी आणि अल्पेश ठाकोर यांनी उघडलेली जोरदार आघाडी यामुळे भाजापाविरोधी मतदारांचा कल काँग्रेसच्या दिशेने झुकल्याचे दिसत आहे. त्याचेच प्रतिबिंब आज जाहीर झालेल्या एबीपी न्यूज आणि सीएसडीएसच्या ओपिनियन पोलमध्ये दिसले आहे. या पोलममध्ये वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार राज्यात 22 वर्षांनंतर प्रथमच काँग्रेसच आणि भाजपात अटीतटीची लढत होण्याची चिन्हे दिसत असून. दोन्ही पक्षांना प्रत्येकी 43 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. मात्र असे असले तरी भाजपा निसटत्या बहुमतासह सत्ता राखण्याची शक्यता असून, भाजपाला 91 ते 99 तर काँग्रेसला 78 ते 86 जागा मिळण्याचा अंदाज वर्तंवण्यात आला आहे. तर इतरांना 3 ते 7 जागा मिळण्याचा अंदाज आहे.
एबीपी न्यूज आणि सीएसडीएसच्या आज जाहीर झालेल्या फायनल ओपिनियन पोलमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवारीत अनेक नवी समीकरणे दिसून आली आहे. तसेच पारंपरिक बालेकिल्ल्यांमध्ये सत्ताधारी भाजपाची पिछेहाट होताना दिसत आहे. भाजपाची मतांची टक्केवारी मोठ्या प्रमाणावर घटून केवळ 43 टक्केच मते भाजपाला मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसलाही 43 टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे. या मतांचे जागांमध्ये रुपांतर करायचे झाल्यास भाजपाला 91 ते 99 तर काँग्रेसला 78 ते 86 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर इतरांना 3 ते 7 जागा मिळू शकतात. जागांची सरासरी काढल्यास भाजपाला 95, काँग्रेसला 82 आणि इतरांना 5 जागा मिळू शकतात.या ओपिनियन पोलमध्ये गुजरातच्या मतदारांचा विभागवार दिसून आलेला कल पुढीलप्रमाणे
सौराष्ट्र-कच्छ भागात भाजपाला आघाडी- सौराष्ट्र-कच्छमध्ये भाजपाला 45 टक्के मते, तर काँग्रेसकडे 39 टक्के मतदारांचा कौल-गेल्यावेळच्या ओपिनियन पोलपेक्षा या पोलमध्ये भाजपाच्या मतांमध्ये वाढ- ग्रामीण भागात काँग्रेसला अनुकूल वातावरण- शहरांमध्ये मतदारांचा मोठ्या प्रमाणात भाजपाकडे कल- पटेलांच्या नाराजीचा भाजपाला फटका नाही
उत्तर गुजरातमध्ये काँग्रेसला मोठी आघाडी
- उत्तर गुजरातमध्ये काँग्रेसला 49 टक्के मतदारांचा पाठिंबा, तर 45 टक्के मतदार भाजपाच्या बाजूने - ग्रामीण भागात मतदारांचा काँग्रेसला मोठा पाठिंबा, 56 टक्के मतदार काँग्रेसच्या बाजूने, तर केवळ 41 टक्के मतदार भाजपाच्या बाजूने- शहरी भागात 50 टक्के मतदार भाजपाच्या बाजूने तर 41 टक्के मतदार काँग्रेसच्या बाजूने
दक्षिण गुजरातमध्ये काँग्रेसला आघाडी - दक्षिण गुजरातमध्ये भाजपाच्या मतांमध्ये मोठी घट- दक्षिण गुजरातमध्ये भाजपाला 40 तर भाजपाला 42 टक्के मतदारांचा पाठिंबा - ग्रामीण भागात 44 टक्के मतदार भाजपाच्या बाजूने तर 42 टक्के मतदारांचा काँग्रेसकडे कल- शहरी भागात 36 टक्के मतदारांचा कल भाजपाकडे तर 43 टक्के मतदारांचा काँग्रेसला पाठिंबा
मध्य गुजरात मध्ये भाजपाला निसटती आघाडी- मतांमध्ये घट होऊनही मध्य गुजरातमध्ये भाजपाकडे निसटती आघाडी- मध्य गुजरातमध्ये भाजपाला 41 तर काँग्रेसला 40 टक्के मते मिळण्याचा अंदाज - ग्रामीण भागात भाजपाकडे 43 तर काँग्रेसकडे 47 टक्के मतदारांचा कल- शहरी भागात 35 टक्के भाजपा तर 20 टक्के मतदार काँग्रेसच्या बाजूने