शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
2
काँग्रेसची पाकिस्तानची भाषा, पीएम मोदींचा पुण्यातून हल्लाबोल; शरद पवारांवर एक शब्दही नाही
3
"माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये असताना हा माणूस विकला गेला"; राज ठाकरे दिलीप लांडेंवर भडकले
4
अमित शाहांचा मुंबईकरांना शब्द; म्हणाले, "बांगलादेशी, रोहिग्यांना वेचून वेचून बाहेर काढणार"
5
"फूट पडली तर काँग्रेस तुमचं आरक्षण हिरावून घेईल..."; मोदींनी विरोधकांवर त्यांचाच डाव उलटवला!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'माझी बॅग तुझ्याकडेच देतो, घेऊन येत जा,मात्र त्यातील कपडे चोरू नको'; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचले
7
"भाजपसाठी काश्मीर सत्तेपेक्षा प्रिय, उद्धव ठाकरेंनी सांगावं की..."; अमित शाहांचा मविआवर हल्लाबोल
8
महायुतीला किती जागा मिळतील? CM शिंदेंनी थेट आकडाच सांगितला; म्हणाले, “जनतेचा विश्वास...”
9
"जेव्हा-जेव्हा हिंदूंमध्ये फूट पडली, तेव्हा-तेव्हा देशाचा एक भाग वेगळा झाला"; 'बटेंगे तो कटेंगे'वर शेखावत थेटच बोलले
10
"मुख्यमंत्री केलं तर वरचढ होईल म्हणून अजित पवारांना पण...; भुजबळांचा शरद पवारांविषयी गौप्यस्फोट
11
भाजपच्या सभेत मिथुन चक्रवर्तींचे पाकिट चोरले; स्थानिक नेत्यांची चोराला अपील, व्हिडिओ व्हायरल
12
"५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
13
“उद्धव ठाकरेंच्या बॅगेत असे काय आहे? एवढी आगपाखड करायचे कारण काय?”; शिंदे गटाने डिवचले
14
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
15
Shocking! एक कार शेकडोंच्या गर्दीत घुसली; 35 जणांचा मृत्यू, ४३ जखमी, ड्रायव्हर कोमात
16
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
17
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्रिपदावरुन महाविकास आघाडीमध्ये वाद? उद्धव ठाकरेंनी एका शब्दात विषयच संपवला
19
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस
20
“मविआ सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफी, महिलांना खटाखट ३ हजार देऊ”; राहुल गांधींची गॅरंटी

भूसंपादन विधेयकावर विरोधक आक्रमक

By admin | Published: February 24, 2015 11:40 PM

वादग्रस्त भूसंपादन विधेयकावर विरोधकांनी एकजूट दाखवत आक्रमक धोरण अवलंबल्यामुळे राज्यसभेत अल्पमतात असलेल्या मोदी

नवी दिल्ली : वादग्रस्त भूसंपादन विधेयकावर विरोधकांनी एकजूट दाखवत आक्रमक धोरण अवलंबल्यामुळे राज्यसभेत अल्पमतात असलेल्या मोदी सरकारने नमते घेत सर्व पक्षांसोबत चर्चेची तयारी दर्शविली आहे.विधेयक शेतकरीविरोधी असून केवळ कंपनी व कार्पोरेट जगताच्या भल्यासाठी असल्याचा आरोप करीत मंगळवारी काँग्रेस, डावे पक्ष, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पक्ष, बसपा आणि संजदच्या खासदारांनी सरकारची चांगलीच कोंडी केली. एक तास संतप्त चर्चा चालल्यानंतर या मुद्यावर सर्व पक्षांशी चर्चा करण्याबाबत मी संबंधित मंत्र्याला भावना कळविणार असल्याचे आश्वासन राज्यसभेतील नेते अरुण जेटली यांनी दिले.विकासात्मक कार्यक्रम राबविताना शेतकऱ्यांचे हित जोपासत मार्ग काढण्यासाठी सर्व पक्षांसोबत सरकारने चर्चा करावी, संसदेत कोंडी निर्माण होऊ नये,असे समाजवादी पक्षाचे रामगोपाल यादव यांनी म्हटले. सर्वपक्षांची सहमतीची गरज लक्षात घेता जेटलींनी पुढील पाऊल उचलण्याची गरज असल्याचे काँग्रेसचे उपनेते आनंद शर्मा यांनी म्हटले. जेटली म्हणाले, स्वातंत्र्यापासून एकूण ६३९ वटहुकूम जारी झाले असून त्यातील ८० टक्के वटहुकूम काँग्रेसच्या राजवटीतील आहेत.लोकसभेत सभात्यागभूसंपादन विधेयक शेतकरी व गरीबविरोधी असल्याच्या घोषणा सर्व विरोधी पक्षांनी लोकसभेत सभात्याग केला. ग्रामीण विकास मंत्री बीरेंदरसिंग यांनी सुधारित विधेयक सादर करण्याची परवानगी मागताच कॉंग्रेस, तृणमूल, आप, राजद, डाव्या पक्षांच्या सदस्यांनी अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्या आसनासमोर धाव घेतली.