नवी दिल्ली : डिझेल, पेट्रोलच्या गगनाला भिडणाऱ्या किमतीविरोधात काँग्रेस व विरोधी पक्षांनी सोमवारी पुकारलेल्या भारत बंदमुळे केरळ, कर्नाटक, बिहार, ओडिशा, अरुणाचल प्रदेशसह काही राज्यांतील जनजीवन विस्कळीत झाले, तसेच सरकारी, खासगी कार्यालये, दुकाने बंद होती.बिहारमधील गया जिल्ह्यातील एका गावातील रहिवासी प्रमोद मांझी यांच्या दोन वर्षे वयाच्या मुलीचा सोमवारी मृत्यू झाला. भाजपने आरोप केला आहे की, या मुलीला डायरिया झाल्याने तिला सतत उलट्या होत होत्या. बंदमुळे तिला रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी तत्काळ वाहन न मिळाल्याने व वेळेत उपचार न झाल्याने ती मरण पावली. बिहारमध्ये बंदच्या दिवशी काही हिंसक घटना घडल्या. झारखंडमध्ये दुकाने बळजोरीने बंद करण्याच्या प्रयत्नात असलेल्या ५८ काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, मिझोराममध्ये बंदचा फारसा परिणाम जाणवला नाही. दिल्लीमध्ये बंद असूनही कार्यालये, शाळा, महाविद्यालये नेहमीप्रमाणेच सुरू होती. भाजपशासित राज्यांपैकी गुजरातमध्ये निदर्शने करणाºया ३०० काँग्रेस कार्यकर्त्यांना अटक केली.
डिझेल, पेट्रोलच्या गगनाला भिडणाऱ्या किमतीविरोधात विरोधक रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 5:04 AM