नवी दिल्लीः ज्यांच्या कामाचं संपूर्ण जग कौतुक करतो, त्यांच्यावरच विरोधक त्यावर टीका करतात, असं म्हणत जावडेकरांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. आजतकच्या ई-अजेंडा कार्यक्रमात ते बोलत होते. लॉकडाऊनचा निर्णय नियोजन न करता घेण्यात आला, असा विरोधकांकडून होत असलेल्या आरोपासंदर्भात विचारले असता, जावडेकर म्हणाले, जर आज लॉकडाऊन नसते तर संक्रमित रुग्णांची संख्या 50 लाखांच्या घरात गेली असती. ही एक संकटाची परिस्थिती आहे, तरीही या काळात आपण केलेल्या कार्याचे संपूर्ण जगाने कौतुक केले आहे. पण आपले विरोधक फक्त टीका करण्यात धन्यता मानत आहेत. कधी म्हणतात, लॉकडाऊन योग्य वेळी लागू झाले नाही. तर लॉकडाऊनमधून सूट दिल्यावरही त्यांना पोटशूळ उठतो.
आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनचा योग्य वेळी निर्णय घेतला. जनतेला अपील केले. त्यांच्या या निर्णयाचे जगाने कौतुक केले. आमचे सरकार सतत काम करत आहे. कोरोनाचे संकट जगभर आहे. कोरोनाची लोकांमध्ये सर्वप्रथम चर्चा केली जात आहे. मोदीजींनी यापूर्वी कोरोनाचं संकट ओळखलं होतं, म्हणूनच त्या संकटाला आपण योग्य पद्धतीनं सामोरे गेलो आहोत. प्रकाश जावडेकर म्हणाले की, चार महिन्यांपूर्वी जेव्हा कोरोना आला, तेव्हा देशात फक्त प्रयोगशाळा होती. आज आपल्याकडे 100 पेक्षा जास्त प्रयोगशाळा आहेत. आज आपल्याकडे 800 कोरोना समर्पित रुग्णालये आहेत. तसेच भारतानं आत्मनिर्भर होत व्हेंटिलेटर बनविण्यास सुरुवात केली आहे, पीपीई किट्स आम्ही बनवत आहोत. जगाच्या तुलनेत भारताचे झालेले नुकसान फारच कमी आहे. मोदींनी केलेल्या आवाहनाला जनतेने पाठिंबा दर्शविला. मोदींच्या मेक इन इंडिया प्रोग्रामला चालना मिळाली. सगळे जण एकत्र आले आणि शेतीपासून संरक्षणापर्यंत बरीच सुधारणा झाली. हे सर्व बदल कोरोना विषाणूमुळे झाल्याचंही जावडेकरांनी अधोरेखित केलं.
हेही वाचा!
जैन समाजाच्या साधू-साध्वींना प्रवास करण्यास सरकारची परवानगी, पण 'हे' नियम पाळावे लागणार
CoronaVirus: अनर्थ टळला! एअर इंडियाचं विमान आकाशात असतानाच वैमानिक पॉझिटिव्ह निघाला अन्...