"विरोधकांना मणिपूर मुद्द्यावर केवळ राजकारण करायचंय; ...यामुळेच तेथील जनतेनं काँग्रेसचा हात सोडला"

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2023 05:41 PM2023-08-08T17:41:59+5:302023-08-08T17:43:34+5:30

श्रीकांत शिंदे म्हणाले, २०१४ पर्यंत नॉर्थ इस्टच्या ७ पैकी 4 राज्यांमध्ये काँग्रेसचे सरकार होते आणि एका राज्यात डाव्यांचे सरकार होते. आज जवळपास संपूर्ण नॉर्थइस्ट एनडीएसोबत आहे.

Opponents only want to play politics on the Manipur issue says MP shrikant shnde | "विरोधकांना मणिपूर मुद्द्यावर केवळ राजकारण करायचंय; ...यामुळेच तेथील जनतेनं काँग्रेसचा हात सोडला"

"विरोधकांना मणिपूर मुद्द्यावर केवळ राजकारण करायचंय; ...यामुळेच तेथील जनतेनं काँग्रेसचा हात सोडला"

googlenewsNext


मणिपूरमध्ये जे काही होत आहे. तो सर्वांसाठी चिंतेचा विषय आहे. आम्ही याची निंदा करतो आणि यावर गांभीर्याने विचार होणे, तसेच कारवाई होणे आवश्यक आहे. मात्र विरोधकांना मणिपूरच्या मुद्द्यावर केवळ राजकारण करायचे आहे, असे म्हणत शिवसेना (एकनाथ शिंदे) खासदार श्रीकांत शिंदे यांनी काँग्रेससह विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. मणिपूर हिंसाचारावरून संसदेत आज मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडण्यात आला. काँग्रेस नेते गौरव गोगाई यांनी लोकसभेत हा प्रस्ताव मांडल्यानंतर, चर्चेला सुरुवात झाली. यावेली शिंदे यांनीही चर्चेत भाग घेतला होता.

श्रीकांत शिंदे म्हणाले, २०१४ पर्यंत नॉर्थ इस्टच्या ७ पैकी 4 राज्यांमध्ये काँग्रेसचे सरकार होते आणि एका राज्यात डाव्यांचे सरकार होते. आज जवळपास संपूर्ण नॉर्थइस्ट एनडीएसोबत आहे. कारण काँग्रेस नॉर्थ इस्टच्या बाबतीत कधीच गंभीर नव्हती. यामुळेच तेथील जनतेने काँग्रेसचा हात सोडला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साथ दिली. यावेळी श्रीकांत शिंदे यांनी २०१४ ते २०२३ दरम्यान केंद्रातील मोदी सरकारने केलेल्या महत्वाच्या कामांचा पाढा वाचला. तसेच येथील विकास कामेही सांगितली. 

याशिवाय, काँग्रेसच्या कार्यकाळात झालेले दहशतवादी हल्ल्यांवर, आणि मोदी सरकारच्या कार्यकाळात पाकिस्तानवर करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राइक आणि एअर स्ट्राइकवरही श्रीकांत शिंदे यांनी भाष्य केले.

२००४ ते २०१४ पर्यंत यूपीएने देशावर राज्य केलं. मात्र देशाला काय मिळाले? -
शिंदे म्हणाले, 'हे  म्हणतात, "नफरत की बाजार, में मोहोब्बतकी दुकान खोल रहा हूं". मला वाटते, एका व्यक्तीच्याविरोधात हे सर्व लोक एकत्रित येत आहेत. ज्यांना कुणी नेता नाही, ज्यांची नियत नाही आणि ज्यांची कसल्याही प्रकारची निती नाही. अशी आघाडी येथे ऊभी झाली आहे. २००४ ते २०१४ पर्यंत यूपीएने देशावर राज्य केलं. मात्र देशाला काय मिळाले? केवळ घोटाळे आणि भष्टाचार. दहशतवादी हल्ले एवढे झाली की, देशातील एकही मोठे शहर या दहशतवादी हल्ल्यापासून सुटले नाही.'

"आडला हरी आणि..." -
'INDIA नाव देऊन आपण लोकांची दिशाभूल करू शकतो, असे यांना वाटते. आज यांच्या आघाडीत पीएम इन वेटिंग आहे. कारण या टीमकडे कुणी कर्णधार नाही आणि यांना सामना लढवायचा आहे अन् विश्वचषक जिंकायचा आहे. आमच्या महाराष्ट्रात एक म्हण प्रसिद्ध आहे, "आडला हरी आणि गाढवाचे पाय धरी". मजबुरी लोकांना काय काय करायला भाग पाडते?' असेही शिंदे यावेळी म्हणाले.

स्किम VS स्कॅमची लढाई -
येथे केवळ NDA vs INDIA चा सामना नाही, तर स्किम VS स्कॅमची लढाई आहे, असे म्हणत श्रिकांत शिंदे यांनी यावेळी युपीए काळात झालेले भष्टाचार आणि NDA काळातील केली गेलेली विकास कामे अल्फाबेटिकली सांगित ABCD च वाचून दाखवली.

Web Title: Opponents only want to play politics on the Manipur issue says MP shrikant shnde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.