शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत मोठा भूकंप होण्याची शक्यता
2
मुख्यमंत्रिपदाबाबत बाळासाहेब थोरातांचं विधान; नाना पटोलेंच्या नावाला विरोध?
3
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?
4
IND vs BAN : मॅचनंतर बायकोनं टाकली 'गुगली'! प्रीतीनं अशी घेतली अश्विनची फिरकी (VIDEO)   
5
६ वर्षांच्या मुलीला माकडांनी बलात्काराची शिकार होण्यापासून वाचवले, जबरदस्ती करणाऱ्या इसमाला फटकावले
6
धक्कादायक! UPSC ची तयारी करणाऱ्या युवकाचा मृतदेह जंगलात सापडला, हत्या की आत्महत्या?
7
पडळकरांकडून सरकारविरोधातच आंदोलनाचं हत्यार; रास्ता रोकोसाठी धनगर समााजाला केलं महत्त्वाचं आवाहन 
8
रेखा झुनझुनवाला यांचे सुपरहिट स्टॉक्स, २०२४ मध्ये दिलाय ८९% परतावा; पाहा कोणते आहेत शेअर्स?
9
Maharashtra Assembly Elections : हरियाणा-काश्मीरनंतर आता महाराष्ट्र विधानसभेचे बिगुल वाजणार! निवडणूक आयोगाने तयारी केली सुरू
10
Maharashtra Politics : शिवसेना शिंदे गटात पक्षातंर्गत वाद?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटानं उडाली खळबळ
11
सिनेट निवडणुकीत चुरस; शिंदेगटाच्या युवासेनेचे 'अभाविप'शी फाटले; पाठिंबा काढला
12
Pitru Paksha 2024: आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पितृपक्षातील अष्टमीला करा 'गजलक्ष्मी व्रत'!
13
महाविकास आघाडीत विदर्भ-मुंबईचा तिढा; मुंबईत उद्धवसेनेला २२, तर विदर्भात काँग्रेसला हव्या ४५ जागा
14
ATM Card वर मिळतो १० लाखांपर्यंतचा फ्री इन्शूरन्स; पाहा केव्हा घेता येतो या सुविधेचा लाभ?
15
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
17
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
18
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
19
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
20
सर्व्हे सांगतात, मविआला मुंबईत २२ जागा मिळणार

"विरोधकांना मणिपूर मुद्द्यावर केवळ राजकारण करायचंय; ...यामुळेच तेथील जनतेनं काँग्रेसचा हात सोडला"

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2023 5:41 PM

श्रीकांत शिंदे म्हणाले, २०१४ पर्यंत नॉर्थ इस्टच्या ७ पैकी 4 राज्यांमध्ये काँग्रेसचे सरकार होते आणि एका राज्यात डाव्यांचे सरकार होते. आज जवळपास संपूर्ण नॉर्थइस्ट एनडीएसोबत आहे.

मणिपूरमध्ये जे काही होत आहे. तो सर्वांसाठी चिंतेचा विषय आहे. आम्ही याची निंदा करतो आणि यावर गांभीर्याने विचार होणे, तसेच कारवाई होणे आवश्यक आहे. मात्र विरोधकांना मणिपूरच्या मुद्द्यावर केवळ राजकारण करायचे आहे, असे म्हणत शिवसेना (एकनाथ शिंदे) खासदार श्रीकांत शिंदे यांनी काँग्रेससह विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. मणिपूर हिंसाचारावरून संसदेत आज मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडण्यात आला. काँग्रेस नेते गौरव गोगाई यांनी लोकसभेत हा प्रस्ताव मांडल्यानंतर, चर्चेला सुरुवात झाली. यावेली शिंदे यांनीही चर्चेत भाग घेतला होता.

श्रीकांत शिंदे म्हणाले, २०१४ पर्यंत नॉर्थ इस्टच्या ७ पैकी 4 राज्यांमध्ये काँग्रेसचे सरकार होते आणि एका राज्यात डाव्यांचे सरकार होते. आज जवळपास संपूर्ण नॉर्थइस्ट एनडीएसोबत आहे. कारण काँग्रेस नॉर्थ इस्टच्या बाबतीत कधीच गंभीर नव्हती. यामुळेच तेथील जनतेने काँग्रेसचा हात सोडला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साथ दिली. यावेळी श्रीकांत शिंदे यांनी २०१४ ते २०२३ दरम्यान केंद्रातील मोदी सरकारने केलेल्या महत्वाच्या कामांचा पाढा वाचला. तसेच येथील विकास कामेही सांगितली. 

याशिवाय, काँग्रेसच्या कार्यकाळात झालेले दहशतवादी हल्ल्यांवर, आणि मोदी सरकारच्या कार्यकाळात पाकिस्तानवर करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राइक आणि एअर स्ट्राइकवरही श्रीकांत शिंदे यांनी भाष्य केले.

२००४ ते २०१४ पर्यंत यूपीएने देशावर राज्य केलं. मात्र देशाला काय मिळाले? -शिंदे म्हणाले, 'हे  म्हणतात, "नफरत की बाजार, में मोहोब्बतकी दुकान खोल रहा हूं". मला वाटते, एका व्यक्तीच्याविरोधात हे सर्व लोक एकत्रित येत आहेत. ज्यांना कुणी नेता नाही, ज्यांची नियत नाही आणि ज्यांची कसल्याही प्रकारची निती नाही. अशी आघाडी येथे ऊभी झाली आहे. २००४ ते २०१४ पर्यंत यूपीएने देशावर राज्य केलं. मात्र देशाला काय मिळाले? केवळ घोटाळे आणि भष्टाचार. दहशतवादी हल्ले एवढे झाली की, देशातील एकही मोठे शहर या दहशतवादी हल्ल्यापासून सुटले नाही.'

"आडला हरी आणि..." -'INDIA नाव देऊन आपण लोकांची दिशाभूल करू शकतो, असे यांना वाटते. आज यांच्या आघाडीत पीएम इन वेटिंग आहे. कारण या टीमकडे कुणी कर्णधार नाही आणि यांना सामना लढवायचा आहे अन् विश्वचषक जिंकायचा आहे. आमच्या महाराष्ट्रात एक म्हण प्रसिद्ध आहे, "आडला हरी आणि गाढवाचे पाय धरी". मजबुरी लोकांना काय काय करायला भाग पाडते?' असेही शिंदे यावेळी म्हणाले.

स्किम VS स्कॅमची लढाई -येथे केवळ NDA vs INDIA चा सामना नाही, तर स्किम VS स्कॅमची लढाई आहे, असे म्हणत श्रिकांत शिंदे यांनी यावेळी युपीए काळात झालेले भष्टाचार आणि NDA काळातील केली गेलेली विकास कामे अल्फाबेटिकली सांगित ABCD च वाचून दाखवली.

टॅग्स :ParliamentसंसदMonsoon Session Of Parliamentसंसेदेचे पावसाळी अधिवेशनShrikant Shindeश्रीकांत शिंदेcongressकाँग्रेसManipur Violenceमणिपूर हिंसाचार