Opposition Alliance Name: 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 23 जून रोजी बिहारच्या पाटण्यात विरोधकांची बैठक झाली. या बैठकीत भाजप सरकारचा पराभव करण्यावर चर्चा झाली. तसेच, सर्व विरोधक एकत्रितपणे लढणार असल्याचे सांगण्यात आले. पुढच्या महिन्यात दुसरी बैठक होणार आहे. दरम्यान, विरोधकांच्या या ऐक्याचे नाव समोर आले आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, भाजपच्या नेतृत्वातील NDA सरकारचा पराभव करण्यासाठी विरोधकांनी त्यांच्या आघाडीला PDA नाव दिले आहे. यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेला नसला तरी अंतर्गत चर्चा सुरू आहे. सीपीआयने हे नाव सूचवले असून, कॉंग्रेसने यावर अद्याप निर्णय घेतलेला नाही. PDA चे हिंदी भाषांतर(पॅट्रिओटिक डेमोक्रेटिक अलायन्स) गुंतागुंतीचे असल्याचे मत काँग्रेस आहे. विरोधी पक्षांची पुढील बैठक 12 ते 14 जुलै दरम्यान शिमल्यात होणार आहे. त्या बैठकीत विरोधी आघाडीचे नाव ठरू शकते.
पाटण्यात विरोधकांची बैठक झालीलोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधकांच्या ऐक्यासाठी शुक्रवारी (23 जून) पाटणा येथे बैठक झाली. या बैठकीत काँग्रेससह अनेक पक्ष सहभागी झाले होते. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला कडवे आव्हान देण्यासाठी एक मजबूत आघाडी तयार करण्याच्या रणनीतीवर विरोधी पक्षांची चर्चा झाली. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी या बैठकीचे आयोजन केले होते. विरोधकांच्या आगामी बैठकांमध्ये कॉमन मिनिमम प्रोग्राम आणि विरोधकांचे नेतृत्व कोण करेल, यावर चर्चा होण्याची अपेक्षा आहे.