शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत मुसळधार पाऊस, लोकल सेवा खोळंबली, सखल भागात साचले पाणी, उद्या शाळांना सुट्टी!
2
हिजबुल्लाहचा पलटवार! इस्रायली निवासी भागांना केलं लक्ष्य, ४० रॉकेट डागले
3
मुंबईत पावसाचं रौद्ररुप, सकाळपर्यंत रेड अलर्ट, अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना
4
'मागितले असते तर सर्व काही दिले असते', अजित पवारांच्या बंडखोरीवर सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या
5
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
6
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
7
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
8
'पीओकेमधून आलेले निर्वासित...', काश्मिरी पंडितांबाबत बोलताना राहुल गांधींची जीभ घसरली
9
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
10
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
11
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
12
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
13
"मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण…’’ अजित पवार यांनी सांगितली नेमकी अडचण  
14
कोहली-रोहितला 'स्पेशल ट्रीटमेंट'? माजी क्रिकेटर थेट BCCI वर कडाडला
15
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
16
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
17
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
18
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
19
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
20
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

विराेधक एकवटले; एकच उमेदवार देणार, राष्ट्रपतिपदासाठी शरद पवार यांनी दर्शविला नकार 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2022 5:34 AM

देशातील लोकशाही व सामाजिक वीण उसवणाऱ्या मोदी सरकारच्या मनसुब्यांना लगाम घालण्यासाठी एकच उमेदवार

सुरेश भुसारीनवी दिल्ली :देशातील लोकशाही व सामाजिक वीण उसवणाऱ्या मोदी सरकारच्या मनसुब्यांना लगाम घालण्यासाठी एकच उमेदवार राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत उतरविण्याचा निर्णय बुधवारी विरोधकांच्या बैठकीत घेण्यात आला.पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रा ममता बॅनर्जी यांच्या पुढाकाराने २२ पक्षांची बैठक आयोजित करण्यात आली होती. १६ पक्षांचे नेते येथील कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये जमले. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेली ही बैठक पावणेदोन तास चालली. पवार यांच्या उमेदवारीवर सर्वांनी एकमत दर्शवले. मात्र, पवार यांनी याला नम्र नकार दिला. राष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराच्या नावावर चर्चा झालेली नसल्याचे ममता बॅनर्जी यांनी बैठकीनंतर स्पष्ट केले. दरम्यान, राष्ट्रपतिपदाच्या नावावर विचार करण्यासाठी एक सुकाणू समिती स्थापन करण्यात आली असून २१ जून रोजी शरद पवार यांच्या निवासस्थानी पुढील बैठक होईल, अशी माहिती शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी दिली.

ठराव संमत बैठकीत संमत झालेला ठराव राष्ट्र मंचचे सुधींद्र कुलकर्णी यांनी वाचून दाखविला. मोदी यांच्या नेतृत्वात असलेले सरकार लोकशाही व सामाजिक वीण उद्धवस्त करीत आहे. त्यामुळे लोकशाहीचा प्रहरी असणारा उमेदवार राष्ट्रपतिपदी असावा, असा विचार करून सर्व विरोधी पक्षांचा मिळून एकच उमेदवार निवडणुकीत उतरविण्याचा निर्णय घेतल्याचे या ठरावात म्हटले आहे.

‘गैरहजर पक्षही येतील’बैठकीला काही अडचणींमुळे काही पक्ष येऊ शकले नाही. त्यांच्याशी चर्चा केली. पुढील बैठकीत ते सर्व पक्षही हजर राहतील, असा दावा ममता बॅनर्जी यांनी केला. लोकशाहीला तुडविणाऱ्या शक्तीचा धोका लक्षात घेऊन विरोधी पक्ष एकत्र आल्याचे त्यांनी सांगितले.

सर्वसहमतीसाठी भाजपचे प्रयत्न- या निवडणुकीसाठी सर्व सहमतीने उमेदवार देण्याचा प्रयत्न भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकारचा आहे. - भाजपाचे नेते राजनाथ सिंह हे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि सपाचे अखिलेश यादव यांच्याशी चर्चा करत आहेत. - राजनाथ सिंह यांनी बीजेडीचे नवीन पटनायक, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, बसपाच्या प्रमुख मायावती आणि जदयूचे नितीशकुमार यांच्याशीही संवाद साधला आहे. - एनडीएचा संभाव्य उमेदवार कोण असेल याबाबत विरोधकांनी राजनाथ सिंह यांना विचारणा केल्याचे समजते. 

राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून विरोधी पक्षांनी माझ्या नावाची शिफारस केली. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. परंतु या प्रस्तावाला मी नम्रपणे नकार देत आहे. जनसेवेचे माझे व्रत यापुढेही सुरूच राहील.      - शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस.

टॅग्स :Presidentराष्ट्राध्यक्ष