मनपाच्या दारातच खड्डा खोदून दफन विधीचा प्रयत्न भिल्ल समाजातील युवकांचे आंदोलन: दफनभूमीवरील अतिक्रमण हटवित नसल्याचा आरोप
By admin | Published: June 26, 2016 8:42 PM
जळगाव: आदिवासी भिल्ल समाजाच्या दफनभूमीसाठी जिल्हाधिकार्यांनी दिलेल्या जागेवर अतिक्रण आहे. ते हटविण्याचे आदेश असतानाही दुर्लक्ष केले जात आहे, त्याच्या निषेधार्थ आदिवासी भिल्ल समाजातील तिघा युवकांनी रविवारी सायंकाळी एका वृद्धेचा मृतदेह पुरण्यासाठी चक्क मनपाच्या सतरा मजली इमारतीच्या प्रवेशद्वारासमोरच खड्डा करण्यास सुरूवात केली. पोलिसांना ही बाब समजताच त्यांनी तिघा युवकांना ताब्यात घेतले.
जळगाव: आदिवासी भिल्ल समाजाच्या दफनभूमीसाठी जिल्हाधिकार्यांनी दिलेल्या जागेवर अतिक्रण आहे. ते हटविण्याचे आदेश असतानाही दुर्लक्ष केले जात आहे, त्याच्या निषेधार्थ आदिवासी भिल्ल समाजातील तिघा युवकांनी रविवारी सायंकाळी एका वृद्धेचा मृतदेह पुरण्यासाठी चक्क मनपाच्या सतरा मजली इमारतीच्या प्रवेशद्वारासमोरच खड्डा करण्यास सुरूवात केली. पोलिसांना ही बाब समजताच त्यांनी तिघा युवकांना ताब्यात घेतले. आदिवासी भिल्ल समाजाच्या दफनभूमीसाठी शासनाने नेरीनाका स्मशानभूमीशेजारील सर्व्हे नं.१५३ मधील जागा दिली आहे. मात्र त्यावर अतिक्रमण झालेले आहे. त्यामुळे दफनविधीसाठी पुरेसी जागा उपलब्ध नाही. याबाबत समाजातर्फे जिल्हाधिकार्यांना २०१३ मध्ये निवेदन देऊन अतिक्रमण काढण्याची मागणी केली होती. त्यानुसार जिल्हाधिकार्यांनी मनपाला या जागेवरील अतिक्रमण हटविण्याची सूचना केली होती. मात्र मनपा अतिक्रमण विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करूनही या दफनभूमीवरील अतिक्रमण हटविलेे गेलेले नसल्याची व्यथा या युवकांनी मांडली. मृतदेह पुरण्यासाठी केला खड्डारविवारी तंट्याभिल्ल सोसायटीतील एका वृद्धेचा आजाराने मृत्यू झाला. मेल्यानंतर तरी तिला पुरण्यासाठी चांगली जागा मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त करीत अरूण सिताराम मोरे (३३), मनोज सिताराम मोरे (२६) व अन्य एक अल्पवयीन युवक सर्व रा.तंट्याभिल्ल सोसायटी यांनी रविवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास मनपाच्या सतरामजली इमारतीसमोर प्रवेशद्वारातचमृतदेह पुरण्यासाठी खड्डा खोदण्यास प्रारंभ केला. पोलिसांनी घेतले ताब्यातशहर पोलिसांना कुणीतरी ही खबर दिली. त्यामुळे तातडीने पोलिसांनी येऊन या तिघा युवकांना ताब्यात घेतले. तसेच शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.