"विरोधकांच्या 'इंडिया' आघाडीने झारखंडमध्ये सरकार पडण्यापासून वाचवलं"; राहुल गांधींचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2024 11:09 AM2024-02-03T11:09:26+5:302024-02-03T11:10:11+5:30

"भाजपाला आम्ही घाबरत नाही, लढत राहतो"

Opposition India alliance saves government from fall in Jharkhand claims Rahul Gandhi | "विरोधकांच्या 'इंडिया' आघाडीने झारखंडमध्ये सरकार पडण्यापासून वाचवलं"; राहुल गांधींचा दावा

"विरोधकांच्या 'इंडिया' आघाडीने झारखंडमध्ये सरकार पडण्यापासून वाचवलं"; राहुल गांधींचा दावा

Jharkhand Politics, Rahul Gandhi vs BJP: झारखंडमध्ये गेल्या काही दिवसांपासून नाट्यमय घडामोडी घडताना दिसत आहेत. सर्वप्रथम मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे दिल्लीला गेले आणि बेपत्ता असल्याचे समजले. त्यानंतर त्यांना ईडीने अटक केली. झारखंडमध्ये सरकार कोसळणार अशी चर्चा रंगू लागली. त्यात चंपई सोरेन यांनी झारखंडच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली असली, तरी राज्यातील राजकीय तापमान शांत झालेले नाही. ३६ आमदारांना हैदराबादला हलवण्यात आले आहे. कारण महाआघाडीचे आमदार फोडण्याचा धोका आहे. या दरम्यान, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी एक दावा केला आहे. विरोधकांच्या इंडिया आघाडीमुळेच झारखंडमध्ये सरकार पाडण्यात भाजपाला यश मिळाले नाही असे त्यांनी म्हटले आहे. तसेच, झारखंडमधील जनतेने दिलेला जनादेश वाया घालवण्यापासून भाजपाला रोखण्यात इंडिया आघाडी यशस्वी झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे. आपल्या भारत जोडो न्याय यात्रेला शनिवारी झारखंडमधील गोड्डा येथील सरकंदा चौकातून सुरुवात केली. त्यावेळी त्यांनी विधान केले.

"भाजपने मनी पॉवर आणि तपास यंत्रणांचा वापर केला. आम्ही भाजपला घाबरत नाहीत आणि फुटीर विचारसरणीशी लढत राहतो. पूर्वीची भारत जोडो यात्रा आरएसएस आणि भाजपच्या 'विभाजनकारी अजेंड्या'च्या विरोधात होती, परंतु सध्याची यात्रा देशातील जनतेला न्याय देण्याची मागणी करणारी आहे. झारखंडमध्ये निवडून आलेले सरकार अस्थिर करण्याचा भाजपने प्रयत्न केला. पण इंडिया आघाडीने तसे होऊ दिले नाही," असे राहुल गांधी स्पष्ट शब्दांत म्हणाले.

ते पुढे म्हणाले, "भारत आघाडीने पक्षाला जनादेश चोरू दिला नाही. महागाई आणि वाढती बेरोजगारी यासह देशभरात मोठ्या प्रमाणावर अन्याय दिसून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भारतात तरुणांना रोजगार मिळणे अशक्य आहे. देशातील बेरोजगारीचा दर 40 वर्षांतील सर्वाधिक आहे. तुमची 'मन की बात' आम्ही ऐकतो, पण आमच्या मनात जे आहे ते तुम्ही सांगू नका, आमचे ऐकत चला."

 

 

 

 

 

 

 

 

Web Title: Opposition India alliance saves government from fall in Jharkhand claims Rahul Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.