जातीय हिंसाचाराबाबत विरोधी नेत्यांना चिंता; संयुक्त निवेदनात पंतप्रधानांच्या मौनावरून टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2022 06:54 AM2022-04-17T06:54:14+5:302022-04-17T06:55:00+5:30
काँग्रेसच्या अध्यक्ष साेनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत साेरेन यांच्यासह १३ नेत्यांनी निवेदनावर स्वाक्षरी केली आहे.
नवी दिल्ली: देशातील जातीय हिंसाचार व द्वेषपूर्ण भाषणांबाबत विराेधी पक्षांच्या १३ नेत्यांनी चिंता व्यक्त करीत या मुद्दयांवर पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचे माैन धक्कादायक असल्याची टीकाही केली. विराेधी पक्षांच्या नेत्यांनी संयुक्त निवेदन जारी केले.
काँग्रेसच्या अध्यक्ष साेनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत साेरेन यांच्यासह १३ नेत्यांनी निवेदनावर स्वाक्षरी केली आहे.
त्यात म्हटले आहे, लोकांना भडकाविणाऱ्यांविरोधात पंतप्रधान काहीही बाेलले नाहीत. त्यांचे माैन धक्कादायक आहे. समाजात फूट पाडण्याचे प्रयत्न करणाऱ्या विचारधारेविरुद्ध लढण्याचा निर्धार असल्याचा संकल्पही विराेधी नेत्यांनी मांडला आहे. शांतता कायम राखत जातीय तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न यशस्वी हाेऊ देऊ नये, असे आवाहनही निवेदनात केले आहे.