नवी दिल्ली - लोकसभेच्या निवडणुकीनंतर संसदेच्या अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली असून, लोकसभेमध्ये नवनियुक्त खासदारांच्या शपथविधीची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, या शपथविधीवेळी भाजपाच्या वादग्रस्त खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर या शपथ घेत असताना लोकसभेमध्ये जोरदार गोंधळ झाला. प्रज्ञा सिंह ठाकूर या शपथ घेण्यासाठी आल्यावर विरोधकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. विरोधी पक्षातील सदस्यांनी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या नावास आक्षेप घेतला. प्रज्ञा सिंह या संस्कृत भाषेत शपथ घेत होत्या. त्यांनी संस्कृतमध्ये आपले नाव उच्चारताच विरोधी पक्षांकडून विरोधात सुरुवात झाली. प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी शपथ घेताना केवळ स्वत:चे नाव घ्यावे, अशी मागणी विरोधकांनी केली.
प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या शपथविधीदरम्यान विरोधकांचा लोकसभेत गोंधळ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2019 5:50 PM