संसदेच्या कामकाजात अडथळा; 15 विरोधी खासदारांचे संपूर्ण अधिवेशनातून निलंबन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2023 03:57 PM2023-12-14T15:57:29+5:302023-12-14T15:58:04+5:30

Opposition MPs Suspended: काँग्रेसच्या 5 खासदारांसह एकूण 15 विरोधी खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

Opposition MPs Suspended: Disruption of Parliament; Suspension of 15 opposition MPs from the entire session | संसदेच्या कामकाजात अडथळा; 15 विरोधी खासदारांचे संपूर्ण अधिवेशनातून निलंबन

संसदेच्या कामकाजात अडथळा; 15 विरोधी खासदारांचे संपूर्ण अधिवेशनातून निलंबन

Opposition MPs Suspended: संसदेच्या सुरक्षेत घडलेल्या गंभीर चुकीमुळे विरोधकांनी संसदेत प्रचंड गोंधळ घातला. यावेळी विरोधी पक्षाच्या 15 खासदारांचे निलंबन करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. संसदेच्या कामात अडथळा आणल्याप्रकरणी लोकसभेतील 14 आणि राज्यसभेतील एका खासदारावरलोकसभा अध्यक्षांनी निलंबनाची कारवाई केली आहे. हे निलंबन संपूर्ण अधिवेशनासाठी लागू असेल. निलंबन करण्यात आलेल्या खासदारांमध्ये काँग्रेसच्या 5 खासदारांचा समावेश आहे. यानंतर संसदेचे कामकाज उद्यापर्यंत तककूब करण्यात आले.  

संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी खासदारांच्या निलंबनाचा ठराव मांडला होता. सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आणल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. सुरुवातीला काँग्रेसच्या टीएन प्रतापन, हिबी इडन, जोतिमणी, रम्या हरिदास आणि डीन कुरियाकोस यांना हिवाळी अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबित करण्यात आले. त्यानंतरही गदारोळ थांबला नाही, म्हणून लोकसभा अध्यक्षांनी आणखी 9 सदस्यांना हिवाळी अधिवेशनातून निलंबित केले. यामध्ये बेनी बेहानन, मोहम्मद जावेद, पीआर नटराजन, कनिमोझी, व्हीके श्रीकंदन, के सुब्रमण्यम, एसआर पार्थिबन, एस वेंकटेशन आणि मणिकम टागोर यांचा समावेश आहे.

संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी लोकसभेत म्हटले की, काल (बुधवार, 13 डिसेंबर) घडलेली दुर्दैवी घटना ही लोकसभा सदस्यांच्या सुरक्षेतील गंभीर त्रुटी होती आणि लोकसभा अध्यक्षांचे निर्देशानुसार या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी सुरू करण्यात आली आहे.  या मुद्द्यावर कोणत्याही सदस्याकडून राजकारण अपेक्षित नाही. पक्षीय राजकारणाच्या वरती जाऊन काम करावे लागेल, असे ते म्हणाले. 
 

Web Title: Opposition MPs Suspended: Disruption of Parliament; Suspension of 15 opposition MPs from the entire session

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.