शहरं
Join us  
Trending Stories
1
CM म्हणून शिंदेंना मोठी पसंती, उद्धव ठाकरेंना किती मते; फडणवीस-राज ठाकरेंना किती टक्के कौल?
2
“नाना पटोलेंनी मुख्यमंत्री होणार असे कुठेही म्हटले नाही”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
3
Exit Poll: दोन्ही NCP तुल्यबल; एकनाथ शिंदेच ठरणार वरचढ, उद्धव ठाकरेंना किती जागा मिळणार?
4
१०७ जागांसह भाजपा सर्वांत मोठा पक्ष, महाविकास आघाडीला १०२ जागा; नवीन Exit Pollचा अंदाज
5
अदानी समूहाला आणखी एक झटका; अडचणीत असताना मोठा आंतरराष्ट्रीय करार रद्द
6
महायुती की मविआ, कुणाला मिळणार 'सिंहासन'? विभागनिहाय कुणाचं पारडं ठरणार जड? असा आहे लेटेस्ट 'Exit Poll'!
7
"दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण झालेल्या व्यवस्था अन् संस्था कोलमडत आहेत"; गयानाच्या संसदेत काय बोलले PM मोदी?
8
मनोज जरांगेंची ऐनवेळी निवडणुकीतून माघार; ४८ टक्के मराठा समाजाने महायुतीला दिली पसंती
9
Exit Poll: २०१९ मध्ये एकमेव खरा ठरलेला एक्झिट पोल आला; महायुती-मविआच्या मतांत १० टक्क्यांचे अंतर...
10
“गुलाल आम्ही उधळणार, महायुतीची सत्ता ५ वर्ष टिकणार, एकनाथ शिंदेच CM होणार”: संतोष बांगर
11
मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरण; हायकोर्टाकडून आरोपीला जामीन
12
“अमित शाह यांनी CM भाजपाचा असेल असे कधी म्हटले नाही”; महायुतीतील नेत्याचे सूचक विधान
13
‘लाडकी बहीण’ योजनेचा फायदा महायुतीला मिळेल का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महिलांनी मतदान...”
14
“अदानींविरोधात अमेरिकेत काढलेले अटक वॉरंट म्हणजे देशासाठी शरमेची गोष्ट”: संजय राऊत
15
“लाच देऊन कंत्राटे मिळवल्याचे स्पष्ट, भ्रष्ट गौतम अदानींना अटक का करत नाही?”: नाना पटोले
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना अटक होणार? इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टानं जारी केलं 'अरेस्ट वॉरंट'
17
"सरकार तर स्थापन होऊ द्या"; मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवरुन काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने नाना पटोलेंना झापलं
18
IND vs AUS: ना विराट, ना रोहित, ना बुमराह; ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर 'हा' खेळाडू ठरेल 'हिरो'- पुजारा
19
गुगलला क्रोम ब्राऊझर विकावा लागण्याची शक्यता; अमेरिकन सरकार दबाव टाकणार
20
IND vs AUS: "विराट म्हणजे क्रिकेटचा सुपरस्टार"; ऑस्ट्रेलियन खेळाडूची पत्नी 'किंग कोहली'वर फिदा

वक्फ बोर्डासाठी आयोजित JPC च्या बैठकीत पुन्हा राडा; विरोधकांचा वॉक आऊट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 5:41 PM

JPC Meeting: गेल्या बैठकीत भाजप आणि तृणमूल खासदारांमध्ये बाचाबाची झाली होती.

JPC Meeting : केंद्र सरकारने वक्फ (दुरुस्ती) विधेयक 2024 वर चर्चा करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीच्या बैठकीत पुन्हा गोंधळ उडाला. यापूर्वीच्या बैठकीत तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी काचेची बाटली फोडल्याची घटना घडली होती. तर, यावेळी विरोधी पक्षाच्या खासदारांनी बैठकीचा विरोध करत सभात्याग केला. सभेत ज्या प्रेझेंटेशनवर चर्चा सुरू होती, ती बनावट असल्याचा आरोप विरोधकांनी केला.

प्रेझेंटेशनमध्ये बदल केलासमितीसमोर हजर झालेल्या दिल्ली महानगरपालिकेचे (एमसीडी) आयुक्त आणि दिल्ली वक्फ बोर्डाचे प्रशासक अश्विनी कुमार यांनी मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेशिवाय वक्फ बोर्डाच्या सादरीकरणात बदल केल्याचा दावा विरोधी सदस्यांनी केला. आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह, द्रमुकचे खासदार मोहम्मद अब्दुल्ला, काँग्रेसचे नसीर हुसेन आणि मोहम्मद जावेद यांच्यासह इतर विरोधी सदस्यांनी बैठकीतून काढता पाय घेतला. 

29 ऑक्टोबर रोजी पुढील बैठकजेपीसीने वक्फ दुरुस्तीवर चर्चा करण्यासाठी दिल्ली वक्फ बोर्ड, हरियाणा वक्फ बोर्ड, पंजाब वक्फ बोर्ड, उत्तराखंड वक्फ बोर्ड, कॉल फॉर जस्टिस आणि वक्फ टेनंट्स वेल्फेअर असोसिएशन, सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीशांच्या गटाला बोलावले होते. या बैठकीत पुन्हा एकदा गदारोळ झाला. मात्र, सभात्याग करून सर्व खासदार काही वेळातच पुन्हा बैठकीत सामील झाले. आता जेपीसीची पुढील बैठकही 29 ऑक्टोबरला होणार आहे.

कल्याण बॅनर्जी यांनी बाटली फोडलीजेपीसीच्या मागील बैठकीत मोठा गोंधळ झाला होता. भाजप आणि टीएमसी नेत्यांमध्ये हाणामारी झाली. तृणमूल काँग्रेसचे नेते कल्याण बॅनर्जी जखमीही झाले. रिपोर्ट्सनुसार, कल्याण बॅनर्जी यांनी तिथे ठेवलेली काचेची बाटली उचलून टेबलावर मारली होती, त्यामुळे ते जखमी झाले. यानंतर कल्याण बॅनर्जी यांना समितीमधून निलंबित करण्यात आले.

टॅग्स :delhiदिल्लीParliamentसंसद