CAA, NRC विरोधात विरोधी पक्षांचे संसदेच्या आवारात आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2020 10:33 AM2020-01-31T10:33:06+5:302020-01-31T10:35:13+5:30
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह इतर विरोधी पक्षांचे ज्येष्ठ नेते या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते
नवी दिल्ली - नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसीविरोधात देशभरात सुरू असलेल्या आंदोलनांचे पडसाद आजपासून सुरू होत असलेल्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही पडताना दिसत आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांनी आज संसदेच्या आवारात नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसीविरोधात आंदोलन केले.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वी विरोधी पक्षांनी केलेल्या आंदोलनामध्ये काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह इतर विरोधी पक्षांचे ज्येष्ठ नेते सहभागी झाले होते. यावेळी आंदोलनकर्त्या नेत्यांनी लोकशाही वाचवा, संविधान वाचवा असा संदेश देणारे फलक हातात घेतले होते.
#WATCH Delhi: Opposition leaders including Congress Interim President Sonia Gandhi protest in front of Gandhi statue in Parliament premises, against #CAA_NRC_NPR#BudgetSessionpic.twitter.com/wolQCzvz0Q
— ANI (@ANI) January 31, 2020
दरम्यान, नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसीविरोधात देशभरात सुरू असलेली आंदोलने, दिल्लीतील शाहीन बाग येथे आंदोलकांनी दिलेला ठिय्या, जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांना झालेली मारहाण यांचे पडसाद आजपासून सुरू होत असलेल्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उमटण्याची शक्यता आहे.
Delhi: Opposition leaders including Congress Interim President Sonia Gandhi protest in front of Gandhi Statue in Parliament premises against #CAA_NRC_NPR#BudgetSessionpic.twitter.com/nxJX8vceZV
— ANI (@ANI) January 31, 2020