शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
2
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
3
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
4
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
6
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
7
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
8
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
9
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
10
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
11
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
12
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
13
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
14
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
15
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
16
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
17
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
18
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
19
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!

शरद पवार इन अ‍ॅक्शन! उद्या दिल्लीत महत्त्वाची बैठक; 'मिशन २०२४'चा प्लान तयार?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2021 2:48 PM

उद्या शरद पवारांच्या निवासस्थानी विरोधकांची मोठी बैठक; काँग्रेसच्या उपस्थितीबद्दल प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली: शस्त्रक्रियनंतर सक्रिय झालेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सध्या दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवार आणि निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्यात एक महत्त्वाची बैठक सुरू आहे. शरद पवार यांच्या निवासस्थानी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. यानंतर शरद पवारांच्या निवासस्थानीच विरोधी पक्षातील १५ ते २० बड्या नेत्यांची बैठक होणार आहे. या भेटीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

गेल्या दोन आठवड्यांत शरद पवार यांनी दोनदा प्रशांत किशोर यांची भेट घेतली आहे. याआधी मुंबईतील शरद पवारांचं निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवर पवार आणि किशोर यांची भेट झाली होती. आता उद्या पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी विरोधी पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांची बैठक होत आहे. या बैठकीला राष्ट्रीय जनता दल, आम आदमी पक्षासह इतर पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत. राजकीय घडामोडींना मोठा वेग; शरद पवार - प्रशांत किशोर यांची दिल्लीत बैठक सुरू

तृणमूलचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी राष्ट्रमंच नावानं एक व्यासपीठ सुरू केलं आहे. याच राष्ट्रमंचाच्या बॅनरखाली उद्या शरद पवार आणि विरोधकांची बैठक होत आहे. या नेत्यांच्या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा होईल. यै बैठकीला काँग्रेसचा प्रतिनिधी किंवा नेता उपस्थित राहणार आहे की नाही, याबद्दलची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

यूपीए की तिसरी आघाडी?शरद पवारांनी काँग्रेसप्रणित यूपीएचं नेतृत्त्व करावं, अशी भूमिका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अनेकदा मांडली आहे. मात्र काँग्रेस याबद्दल फारशी उत्सुक नाही. आता शरद पवारांनी दिल्लीत विरोधकांना एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे पवार तिसरी आघाडी तयार करत आहेत का, अशी चर्चा दिल्लीत सुरू झाली आहे. २०२४ च्या लोकसभेआधी भाजपविरोधात महाआघाडीची गरज असल्याचं विधान काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केलं होतं.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारPrashant Kishoreप्रशांत किशोरYashwant Sinhaयशवंत सिन्हाcongressकाँग्रेसBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस