PM Modi slams Opposition: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी बेंगळुरू येथे होणाऱ्या विरोधी पक्षांच्या महाआघाडीवर जोरदार हल्ला चढवला. या सभेला त्यांनी भ्रष्टाचाऱ्यांचे अधिवेशन म्हटले. पोर्ट ब्लेअर येथील वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीच्या उद्घाटन समारंभात त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला. 'हे लोक अमर्याद भ्रष्टाचार करतात. हे लोक सध्या बेंगळुरूमध्ये व्यस्त आहेत', असेही मोदी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, स्वातंत्र्याच्या 75 वर्षात आपला भारत कुठल्या कुठे पोहोचू शकला असता. आम्हा भारतीयांच्या क्षमतेत कधीच कमी पडलो नाही, पण भ्रष्ट आणि घराणेशाही करणाऱ्या पक्षांनी सर्वसामान्य भारतीयांच्या या क्षमतेवर अन्याय केला. यानिमित्ताने मला अवधी भाषेत लिहिलेल्या कवितेतील एक ओळ आठवते की "गाइत कुछ है, हाल कुछ है, लेबल कुछ है, माल कुछ है". अशा राजकीय पक्षांवर हे अगदी तंतोतंत बसते.
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, विरोधी पक्षाचे लोक दुकाने उघडून आम्हाला रोखू इच्छित आहेत. भारतातील ते गरीब लोक आपली दुकाने उघडून बसले आहेत. त्यांच्या दुकानात 2 गोष्टींची हमी आहे. एक तर ते त्यांच्या दुकानावर जातीवादाचे विष पेरतात आणि दुसरे म्हणजे ते भ्रष्टाचार करतात. सर्व भ्रष्ट लोक मोठ्या प्रेमाने भेटत आहेत, मात्र त्यांच्या दुकानात जमलेले लोक कुटुंबवादाचे समर्थक आहेत. या लोकांचा यावर विश्वास आहे की - कोणताही हिशोब द्यायचा नाही, पुस्तक नाही, कुटुंब जे काही म्हणेल ते बरोबर आहे. हे लोक फक्त आपल्या मुलांचा विचार करतात. देशातील गरिबांच्या मुलांचा विकास होऊ देत नाहीत, तर त्यांच्या स्वत:च्या मुलांचा आणि भाऊ-पुतण्यांचा विकास त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यांची एकच विचारधारा आणि अजेंडा आहे - आपले कुटुंब वाचवा, कुटुंबासाठी भ्रष्टाचार वाढवा, अशा शब्दांत मोदींनी त्यांच्यावर हल्लाबोल केला.